Advertisement

सिद्धार्थ चांदेकर पुन्हा पडला प्रेमात! शनायाशी झालं ब्रेकअप?


सिद्धार्थ चांदेकर पुन्हा पडला प्रेमात! शनायाशी झालं ब्रेकअप?
SHARES

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि प्रेक्षकांची लाडकी शनाया म्हणजेच रसिका सुनील यांच्या ऑफस्क्रीन अफेअरची चर्चा चांगलीच रंगली होती. प्रेक्षकांनीही या जोडीला पसंती दिली होती. मात्र, अचानक काय झालं कुणास ठाऊक? त्यांचं नातं संपल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. सिद्धार्थ शनायाला सोडून दुसऱ्या एका अभिनेत्रीच्या प्रेमात पडल्याच्या चर्चेला सध्या चांगलंच उधाण आलं आहे.


याआधी सिद्धार्थ आणि 'माझ्या नवऱ्याची बायको' फेम शनाया यांनी एकत्र काढलेले फोटो प्रेक्षकांना सोशल मीडियावर बघायला मिळाले. त्यांच्या प्रत्येक फोटोला चाहत्यांनी भरभरून दादही दिली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हे दोघं एकमेकांपासून दुरावले आहेत, असं दिसत आहे. त्यामुळे त्यांचं नातं संपुष्टात आलं. आणि सिद्धार्थच्या नव्या प्रेमाची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली!



सिद्धार्थ सध्या उर्फी फेम मिताली मयेकरला डेट करत आहे. हे दोघं नात्यात आल्याचीही चर्चा आहे. सध्या सोशल मीडियावर हे दोघं एकत्र दिसत आहेत. मिताली इन्स्टाग्रामवर सॉलिड अॅक्टिव्ह असते. त्याचबरोबर झी युवाच्या फ्रेशर्स मालिकेतही तिने काम केलं आहे. सिद्धार्थ आणि मितालीने आपल्या मनगटावर एकत्र टॅटूही काढले आहेत.

पण आता शनायाचा नवा जोडीदार कोण? हे मात्र कळलेलं नाही. तूर्तास शनाया गुरूला इम्प्रेस करण्यात बिझी आहे. आता या चर्चा किती खऱ्या, किती खोट्या? हे शनाया आणि सिद्धार्थच सांगू शकतील. मात्र, आता बॉलिवुडचा लव्ह-ब्रेकअप ट्रेंड मराठीतही रूजू होतोय, हे मात्र नक्की.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा