मधुरा देशपांडे अडकली लग्नबेडीत

सध्या मराठी चित्रपटसृष्टीत लग्नाचे वारे वाहात आहेत. २०१७ मध्ये अनेक कलाकार लग्नबंधनात अडकले. तर २०१८ मध्येही लग्नाचा सिलसिला सुरूच आहे. २०१८ मध्ये अभिनेता अभिषेक देशमुखनंतर अभिनेत्री मधुरा देशपांडे लग्नाच्या बेडीत अडकली आहे.

मधुरा आणि आशय गोखले यांचा ५ आक्टोबरला साखरपुडा झाला होता आणि नव्या वर्षात या दोघांनी विवाह केला. त्यांच्या लग्नाचे त्यांच्या जवळच्या मित्रमंडळीनी फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. कन्यादान आणि इथेच टाका तंबू या मालिकेत मधुराने काम केलं आहे. इथेच टाका तंबू या मालिकेमुळे मधुराने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं.

मधुराचा जोडीदार आशय गोखले हा पुण्याचा असून तो व्यवसायाने आर्किटेक्ट आहे. तसेच 'रिबन्स अॅण्ड बलून्स' मध्येही तो पार्टनर म्हणून कार्यरत आहे. मधुराने लग्नात पिवळ्या रंगाची नववारी साडी नेसली होती. या पिवळ्या रंगामुळे तिचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते. तर आशयने पांढऱ्या रंगाची फ्लॉवर प्रिंटेड शेरवानी घातली होती.


हेही वाचा-

अभिनेता अभिषेक देशमुखही अडकला लग्नबंधनात

२०१७ मध्ये 'हे' सेलिब्रिटी अडकले लग्न बंधनात!


पुढील बातमी
इतर बातम्या