Advertisement

२०१७ मध्ये 'हे' सेलिब्रिटी अडकले लग्न बंधनात!


२०१७ मध्ये 'हे' सेलिब्रिटी अडकले लग्न बंधनात!
SHARES

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली ११ डिसेंबरला लग्नबंधनात अडकले. नुकतंच हे कपल इटलीहून दिल्लीत परतलं आहे. २१ डिसेंबरला दिल्लीत शाही रिसेप्शन आयोजित करण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या रिसेप्शनला हजेरी लावली. तर २६ डिसेंबरला मुंबईत देखील रिसेप्शन होणार आहे.

मात्र, २०१७ या वर्षभरात फक्त अनुष्काच नाही, तर बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी आपला संसार थाटला आहे.


भारती सिंह - हर्ष लिम्बाचिया

कॉमेडिअन भारती सिंहने ३ डिसेंबरला तिचा बॉयफ्रेंड आणि क्रिएटिव्ह रायटर हर्ष लिम्बाचियासोबत लग्न केलं. पाच ते सहा दिवस त्यांचा लग्नसोहळा रंगला होता. २७ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या काळात गोव्यात त्यांचा लग्नसोहळा पार पडला.



मेहंदी, हळद, पूल पार्टी आणि रिसेप्शन या टप्प्यांमध्ये भारतीचा विवाह पार पडला. तिच्या विवाहाला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. भारतीच्या लग्नाचे कार्ड खूप मजेशीर पद्धतीनं डिजाईन केले होते. शिवाय प्रीवेडिंग फोटोशूट देखील मजेशीर होते.


इशिता दत्ता - वत्सल सेठ

कपिल शर्मासोबत 'फिरंगी' या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री इशिता दत्ता २८ नोव्हेंबरला २०१७ रोजी विवाहबंधनात अडकली. जस्ट मोहब्बत आणि टारजन फेम अभिनेता वत्सल सेठसोबत तिनं विवाह केला. जुहू इथल्या इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस मंदिरात हे दोघे विवाहबद्ध झाले.



A post shared by Ishita Dutta (@ishidutta) on


इशिता ही अभिनेत्री तनुश्री दत्ताची बहीण आहे. इशितानं अजय देवगणसोबत 'दृश्यम' या चित्रपटात काम केलं आहे. दृश्यममध्ये इशितानं अजच्या मुलीची व्यक्तीरेखा साकारली होती. याशिवाय तिनं सोनीवरील 'रिश्तों का बाजीगर' या मालिकेत वत्सलसोबत काम केलं आहे. या मालिकेच्या सेटवरच इशिता आणि वत्सलची मैत्री झाली आणि त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं.


आश्का गोराडिया - ब्रेंट ग्लोब

'नागिन' फेम आश्का गोराडियानं ३ डिसेंबरला ब्रेंट ग्लोबसोबत लग्न केलं. ख्रिश्चन आणि गुजराती पद्धतीनं दोघांचं लग्न झालं. अहमदाबादमध्ये हा लग्न सोहळा पार पडला.



आश्का आणि ब्रेंटची ओळख लास वेगस इथं झाली. एका कार्यक्रमादरम्यान या दोघांची ओळख झाली. ब्रेंटसोबत आश्काचं हे दुसरं लग्न आहे. २००६ साली आश्कानं टीव्ही स्टार रोहित बक्षीसोबत संसार थाटला होता. पण त्यांचा हा संसार फार काळ टिकला नाही. २०१६ साली हे कपल वेगळे झाले.


सागरिका घाटगे - झहीर खान

मराठमोळी अॅक्ट्रेस सागरिका घाटगेनं क्रिकेटपटून झहीर खानसोबत २३ नोव्हेंबर २०१७ रोजी कोर्ट मॅरेज केलं. लग्नाला निवडक फॅमिली मेंबर्स आणि मित्र मंडळी उपस्थित होते. कोर्ट मॅरेजनंतर दोघांनी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये कॉकटेल आणि रिसेप्शन पार्टी ठेवली होती.



A post shared by Sagarika (@sagarikaghatge) on


सागरिका क्रिकेटर-अभिनेता अंगद बेदीची फार जवळची मैत्रिण आहे. अंगदनेच सागरिकाची ओळख झहीरशी करून दिली होती. दोघांची ओळख दीड वर्षांपूर्वी झाली होती. मे महिन्यात झहीर-सागरिकाचा साखरपु़डा झाला होता.


नेहा मिश्रा - नमन शॉ

'कसम से' फेम अॅक्टर नमन शॉनं २३ नोव्हेंबरला गर्लफ्रेंड नेहा मिश्रासोबत लग्न केलं. दोघांनी बंगाली पद्धतीनं कोलकातामध्ये लग्न केलं.



A post shared by Naman Shaw (@namanshaw) on


टीव्ही शोच्या सेटवर नमन आणि नेहाची ओळख झाली होती. तेव्हाच या दोघांमध्ये मैत्री झाली. गेल्या आठ वर्षांपासून त्या दोघांमध्ये चांगली मैत्री आहे. आपलं नातं मैत्रीहून अधिक आहे, याची जाणीव दोघांना झाली. त्यानंतरच दोघांनी मैत्रीच्या नात्याला नवीन नाव देण्याचा निर्णय घेतला. याच वर्षी ४ जूनला या दोघांनी साखरपुडा केला होता.


नौहिद क्रूसी - रुस्तम

'हिप हिप हुर्रेर्रे' आणि 'जस्ट मोहब्बत' या मालिकांमध्ये झळकलेली नौहिद क्रूसीनं रुस्तमसोबत 5 जानेवारीला लग्न केलं. पारसी पद्धतीनं हे लग्न झालं.



A post shared by Nauheed Cyrusi (@nauheedc) on


कविता कौशिक - रोनित बिस्वास

'एफआयआर' मालिकेतील इन्स्पेक्टर चंद्रमुखी चौटाला अर्थात अभिनेत्री कविता कौशिकनं 27 जानेवारीला लग्न केलं.



केदारनाथच्या मंदिरात बॉयफ्रेंड रोनित बिस्वाससोबत तिनं लग्न केलं. कवितानं खूप साध्या पद्धतीनं हे लग्न केलं. मीडियाला मात्र तिनं लग्नापासून लांबच ठेवलं.



हेही वाचा

मराठी कलाकारांसाठी २०१७ ठरलं 'लग्नपर्वणी'!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा