
२०१७ मध्ये अनेक मराठी सेलिब्रेटी लग्नबंधनात अडकले आहेत. प्रार्थना बेहेरे, सानिका अभ्यंकर, शशांक केतकर, आरोह वेलणकर यांच्यानंतर आता आणखी एक मराठमोळा अभिनेता लग्नबंधनात अडकणार आहे. अभिनेता सचिन देशपांडे याचा नुकताच साखरपुडा झाला आहे. सचिनने सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटो शेअर करून ही गोड बातमी सगळ्यांना दिली.

सचिनच्या होणाऱ्या पत्नीचं नाव पियुषा बिदनूर आहे. पियुषाचा अभिनयाशी काहीही संबंध नाहीये. मात्र सचिननं साखरपुड्याचे शेअर केलेल्या फोटोमध्ये हे कपल 'मेड फॉर इच अदर' असंच वाटत आहे. या फोटोंमध्ये ते अानंदी दिसत असून सचिन अाणि पियुषाची धम्माल मस्ती त्यात पाहायला मिळत आहे.

सचिनसाठी या मालिका ठरल्या खास
'होणार सून मी या घरची' या झी मराठीवरील गाजलेल्या मालिकेमधून सचिन घराघरात पोहचला. मनीष या त्याच्या पात्राला लोकांनी उचलून धरलं. सध्या सचिनची 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका रसिकांच्या पसंतीस उतरत आहे. मालिकेत येणारे नवनवीन ट्विस्ट सध्या प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. या मालिकेतील श्रेयस हे पात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. सध्या 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका टीआरपीमध्ये पहिल्या स्थानावर आहे.
