सई म्हणतेय #बॅगवती कमिंग सून!

  • मुंबई लाइव्ह टीम & संचिता ठोसर
  • मनोरंजन

अभिनेत्री सई ताम्हणकर म्हणजे धाडसी आणि ग्लॅमरस अभिनेत्री! सईने आपल्या अभिनयाने आणि अदाकारीने अल्पावधीतच रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली. सई सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. सईच्या या अदांनी तिचे चाहते नेहमीच घायाळ होतात. नुकताच सईने #बॅगवती कॅप्शनच्या नावाखाली एक फोटो पोस्ट केला आहे. मात्र हा फोटो नेमका काय आहे? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.

या फोटोवर तिने कमिंग सून लिहिलं होतं. त्यामुळे सईचे चाहते बुचकळ्यात पडले. शुक्रवारी सईनेच आणखी एक फोटो शेअर करत या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. सई 'सॅन कल्प' या हॅण्डमेड बॅगेची जाहिरात करत आहे. नुकतंच सईने या ब्रॅण्डसाठी फोटो शूट केलं. हा ब्रॅण्ड लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या फोटोशूट दरम्यान सई नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत होती.

 

दुनियादारी, मंगलाष्टका वन्स मोअर, जाऊं द्या ना बाळासाहेब आणि नुकताच रिलीज झालेला राक्षस या चित्रपटातून सईने प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. नववर्षाच्या सुरुवातीला सईचा बोल्ड अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळाला.


हेही

सई ताम्हणकरचा दुसऱ्यांदा घटस्फोट?

पुढील बातमी
इतर बातम्या