Advertisement

सई ताम्हणकरचा दुसऱ्यांदा घटस्फोट?


सई ताम्हणकरचा दुसऱ्यांदा घटस्फोट?
SHARES

सई ताम्हणकर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणास्तव कायम चर्चेत असते. यावेळी मात्र नकारात्मक गोष्टींमुळे ती चर्चेत अाली अाहे. अापल्या लाडक्या सईबद्दल एक धक्कादायक गोष्ट समोर अाली अाहे. सई ताम्हणकरचा दुसऱ्यांदा घटस्फोट झालाय, असं कुणी सांगितल्यावर तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे सत्य अाहे. तब्बल दीड वर्षांनंतर ही बाब समोर अाली अाहे.



सई ताम्हणकर अाणि अमेय गोसावी यांचे चार वर्षांपूर्वी म्हणजेच ५ डिसेंबर २०१३ रोजी लग्न झाले होते. सई दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकली होती. सई अाणि अमेय यांचा हा प्रेमविवाह होता. पण दीड वर्षांपूर्वीच सई अाणि अमेयचा घटस्फोट झाल्याचे सूत्रांकडून समजते.


तीन वर्षे डेट अाणि नंतर लग्न

अमेय हासुद्धा सईप्रमाणेच चित्रपट क्षेत्राशी संबंधित असून तो चित्रपट निर्माता अाहे. त्याची लोडिंग पिक्चर्स नावाची कंपनी अाहे. एकाच क्षेत्राशी निगडित असले तरी त्या दोघांनी कधीही एकत्र काम केलेले नाही. तीन वर्षे डेट केल्यानंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. सई अाणि अमेय यांच्यात सर्व काही अालबेल अाहे, असं तिच्या चाहत्यांना वाटत होतं. पण अडीच वर्षे संसाराचा गाडा सुरळीत सुरू असताना अचानक त्यांच्या नात्यात विघ्न अाले अाणि त्यांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला.




बोल्ड फोटोंमुळे सई पुन्हा चर्चेत

नववर्षाच्या सुरुवातीला सईने तेजस नेरूरकरकडून फोटो शूट करून घेतले. या फोटो शूटचा बोल्ड अंदाज सईने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांशी शेअर केला. २०१८च्या सुरूवातीलाच सई अाणखीनच बोल्ड अवतारात दिसली. या फोटोवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्सही दिल्या होत्या.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा