...आणि सोनालीच्या मदतीला 'तो' धावून आला!

  • मुंबई लाइव्ह टीम & संचिता ठोसर
  • मनोरंजन

सर्वसामान्यांप्रमाणे वाहतूक कोंडीचा त्रास हा सेलेब्रिटींनाही सहन करावा लागतो. मुंबईतील खड्डे, मेट्रो, मोनोची सुरू असणारी कामं यामुळे वाहतूक कोंडीत आणखीनच भर पडली आहे. या वाहतूक कोंडीचा त्रास अभिनेत्री सोनाली कुलकर्णीलाही सहन करावा लागला. त्यानंतर तिने आपली ही व्यथा ट्वीटरवर शेअर केली आहे.

सोनाली सिद्धिविनायकाच्या दर्शनाला निघाली होती. पण मेट्रोमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा त्रास सोनालीला सहन करावा लागला. मात्र यावेळी यावेळी सोनालीच्या मदतीसाठी खलिद देवासारखा धावून आला!

 

'मला योगायोग आवडतात. गुलाबजाम सिनेमाच्या टीमसोबत सिद्धिविनायक मंदिरात पोहोचायचं होतं. मात्र वाहतूक कोंडीत अडकले होते. कारमधून बाहेर येऊन मी लिफ्ट मागितली. खलिदचे आभार, ज्याने मला त्याच्या बाईकवरून सिद्धिविनायक मंदिरापर्यंत पोहचवलं. खलिद तू अक्षरश: देवासारखा धावून आलास', असं सोनालीने आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे.

सोनालीच्या या ट्वीटनंतर खलिदवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


हेही वाचा

'शिकारी'चा पहिला ट्रेलर लाँच!

पुढील बातमी
इतर बातम्या