Advertisement

'शिकारी'चा पहिला ट्रेलर लाँच!

चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरपासूनच या चित्रपटाची चर्चा रंगली होती. या चित्रपटाद्वारे नेहा खान मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. नेहा खानबरोबर 'दिल दोस्ती दुनियादारी' आणि 'अमर फोटो स्टुडिओ' या नाटकातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला सुव्रत जोशीचा वेगळा अंदाज बघायला मिळणार आहे.

'शिकारी'चा पहिला ट्रेलर लाँच!
SHARES

एप्रिलमध्ये हीट वाढणार असं म्हणत 'शिकारी' हा चित्रपट एप्रिलपासून वातावरण आणखी तापवणार आहे. दिग्दर्शक विजू माने यांचा 'शिकारी' हा चित्रपट २० एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या पोस्टर्सनी आधीच हवा गरम केली होती. त्यात नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे.


सुव्रत जोशीचा वेगळा अंदाज

चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरपासूनच या चित्रपटाची चर्चा रंगली होती. या चित्रपटाद्वारे नेहा खान
मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. नेहा खानबरोबर 'दिल दोस्ती दुनियादारी' आणि 'अमर फोटो स्टुडिओ' या नाटकातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला सुव्रत जोशीचा वेगळा अंदाज बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर कश्मिरा शहा, मृण्मयी देशपांडे, सिद्धार्थ जाधव यांच्या प्रमुख भुमिका आहेत.


पाच गाणी पाच लेखक

श्रीरंग गोडबोले, गुरु ठाकूर, अखिल जोशी, जितेंद्र जोशी आणि कुमार यांनी चित्रपटाची गाणी लिहिली आहेत. या चित्रपटात पाच गाणी असून ती अवधूत गुप्ते, उर्मिला धनगर, आनंदी जोशी, जुली जोगळेकर, दिव्या कुमार, अपेक्षा धांडेकर आणि रिंकी गिरी यांनी गायली आहेत.

'शिकारी’चा विषय वेगळा आणि मस्त होता. त्यामुळे त्यावर काम करायला मजा आली. तो एक विनोदी आणि संपूर्णतः व्यावसायिक चित्रपट आहे. विनोदाचे बादशाह दादा कोंडके यांना आम्ही वाहिलेली ती एक मानवंदना आहे.


महेश मांजरेकर, अभिनेते-दिग्दर्शक-निर्माते




हेही वाचा

‘शिकारी’च्या टीजरमध्ये नेहा खानचा बोल्ड अंदाज


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा