Advertisement

‘शिकारी’च्या टीजरमध्ये नेहा खानचा बोल्ड अंदाज, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

आधी चित्रपटाचं पहिलं बोल्ड पोस्टर आणि त्यानंतर सिद्धार्थ जाधव आणि एका पाठमोऱ्या बोल्ड अभिनेत्रीचा वेगळाच अंदाज दाखवणारं दुसरं पोस्टर यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली होती. आता चित्रपटाचा टीजर लाँच झाल्यामुळे ही उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

‘शिकारी’च्या टीजरमध्ये नेहा खानचा बोल्ड अंदाज, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
SHARES

पहिल्या निनावी पोस्टरपासूनच प्रेक्षकांमध्ये चर्चेचा आणि उत्सुकतेचा विषय ठरलेला 'शिकारी' आता अधिकच चर्चेत आला आहे. आधी चित्रपटाचं पहिलं बोल्ड पोस्टर आणि त्यानंतर सिद्धार्थ जाधव आणि एका पाठमोऱ्या बोल्ड अभिनेत्रीचा वेगळाच अंदाज दाखवणारं दुसरं पोस्टर यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली होती. आता चित्रपटाचा टीजर लाँच झाल्यामुळे ही उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.



एप्रिलमध्ये HEAT वाढणार आहे!

चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरपासूनच त्याच्या विषयाची चर्चा सुरू झाली होती. या पोस्टरमध्ये एका स्त्रीचे फक्त पाय दिसत होते आणि खाली कॅप्शन होती 'एप्रिलमध्ये HEAT वाढणार आहे'! त्यानंतर आलेल्या दुसऱ्या पोस्टरमध्ये या अनोळखी अभिनेत्रीसोबतच अभिनेता सिद्धार्थ जाधवही दिसला. शिवाय 'शिकारी' हे सिनेमाचं नावही या पोस्टरच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलं.



नेहा खानचं मराठीत पदार्पण

ही अनोळखी अभिनेत्री कोण? याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात होते. मात्र, नुसताच सिनेमाचा टीजर लाँच झाला असून त्यामध्ये या अभिनेत्रीबाबतचा सस्पेन्स संपला आहे. नेहा खान ही अभिनेत्री या सिनेमाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.



चित्रपटाच्या विषयाबाबत सस्पेन्स

सिनेमाचे दोन पोस्टर आणि लाँच करण्यात आलेला टीजर यावरून तरी हा सिनेमा बोल्ड विषयाला हात घालणारा असेल याची खात्री पटली आहे. मात्र, नेमका सिनेमाचा विषय काय आहे? ही ब्लॅक कॉमेडी आहे की सेक्स कॉमेडी? याविषयी काहीही अंदाज लागत नाही. त्यामुळे येत्या २० एप्रिलला जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित होईल, तेव्हाच त्याचा खुलासा होईल.



विजू माने यांचं दिग्दर्शन

नेहा खान आपल्या पहिल्याच मराठी चित्रपटामध्ये एक बोल्ड भूमिका साकारत आहे. याआधी तिने टॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. याशिवाय सिद्धार्थ जाधव प्रमुख भूमिकेत असेल हे तर दुसऱ्या पोस्टरवरूनच स्पष्ट होत आहे. याव्यतिरिक्त भारत गणेशपुरे, भाऊ कदम ही कॉमेडी स्टारकास्टही या चित्रपटात दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे विजू माने या नव्या चित्रपटातून दिग्दर्शनाची कोणती नवी झलक सादर करतात, हेच आता पाहायचं आहे.



हेही वाचा

‘फ्रेंडशिप बँड’एक थरारपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा