Advertisement

‘फ्रेंडशिप बँड’एक थरारपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला


‘फ्रेंडशिप बँड’एक थरारपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
SHARES

वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जिवनावर आधारीत 'फ्रेंडशिप बँड' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.


चित्रपटाची कथा?

वैद्यकीय प्रवेश चाचणी (सीईटी)चा निकाल लागल्यानंतर विद्यार्थी एमबीबीएसला प्रवेश घेतात. आणि मेडिकल कॉलेजात त्यांचा मित्रांचा एक ग्रुप तयार होतो. कालांतराने त्यांच्यात एक मैत्रीचा बंध जुळतो. मैत्रीत धमाल करत असताना सगळेजण एकमेकांना विविध आव्हानं देत असतात. ही आव्हानं म्हणजे 'फ्रेंडशिप बँड’ होय.

मैत्रीतील आव्हानांना पूर्ण केल्याने त्यांच्यातील मैत्री आणखी घट्ट होत जाते. परंतु, एकदा त्यांच्या ग्रुपमधील एक मुलगा ‘शर्वरी’ला मध्यरात्री शवागारातील मृतदेहांना फ्रेंडशिप बँड बांधण्याचं आव्हान देतो. मैत्रीमधले हे आव्हान स्वीकारत मध्यरात्री बारा वाजता शर्वरी मृतदेहांना (डेड बॉडिज्)ना फ्रेंडशिप बँड बांधण्यासाठी शवागारात जाते. मात्र तिथे पुढे जे काही घडतं ते तुम्हाला चित्रपट बघितल्यानंतरच कळणार आहे.

या सिनेमात शर्वरीची भूमिका नेहा खानने बजावली आहे. ती कोल्हापूरच्या प्रसिद्ध राजकारण्याची मुलगी असते. हर्षाली रोडगेने शर्वरीच्या बेस्ट फ्रेंड किरणची भूमिका बजावली आहे. सिनेमात किरण पत्रकाराची मुलगी असून ध्येयनिष्ठ आहे. त्याचबरोबर या थरारपटात स्प्लिट्ज् व्हिला फेम दिव्या अग्रवालची लावणी बघायला मिळणार आहे. सचिन नरेश घाग यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. त्यामुळे जर तुम्हाला थरार अनुभवायचा असेल तर नक्की ‘फ्रेंडशिप बँड’बघा.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा