आता 'सायकल'ची सैर करायला सज्ज व्हा!

  • मुंबई लाइव्ह टीम & संचिता ठोसर
  • मनोरंजन

सध्या कार आणि मोटारसायकलचा जमाना आहे. सुसाट धावणाऱ्या चारचाकी वाहनांमुळे सायकल चालवण्यासाठी मोकळी जागाच कुठे राहिलेली नाही. त्यामुळे सायकल ही जणू काही आठवणीतली गोष्ट झाली आहे. खरेतर आपल्याजवळ असलेल्या जुन्या सायकलवरून पेरफटका मारायचा मोह कुणालाही आवरता येत नाही. पण आता सायकलवरून फेरफटका मारता येत नाही, म्हणून विचार करत बसू नका. तर तो अनुभवा! कारण दिग्दर्शक प्रकाश कुंटे एका सायकलीची गोष्ट घेऊन आले आहेत. त्यामुळे सायकलची सैर करायला सज्ज व्हा. 

कॉफी आणि बरंच काही, अँड जरा हटके या चित्रपटानंतर एका सायकलची गोष्ट प्रकाश कुंटे आपल्यासाठी घेऊन आले आहेत. नुकताच या चित्रपटाचा टीझर लाँच करण्यात आला.

चित्रपटाची कथा?

सायकल या चित्रपटाची कथा स्वातंत्र्यपूर्व काळातली आहे. कोकणातल्या एका छोट्या खेड्यातली ही कथा आहे. या चित्रपटातील त्या पात्राचे आपल्या सायकलवर विषेश प्रेम आहे. चित्रपटाची संपूर्ण कथा एका सायकल भोवती फिरते.

सायकल या चित्रपटात हृषिकेश जोशी, प्रियदर्शन जाधव आणि भालचंद्र कदम यांच्या मुख्य भूमिका आहेत. व्हायाकॉम18 मोशन पिक्चर्स, द स्टुडिओ यांची निर्मिती असलेल्या या सिनेमाचं लेखन अदिती मोघे यांनी केलं आहे.


हेही वाचा

‘अॅट्रॉसिटी’ २३ फेब्रुवारीला चित्रपटगृहात

पुढील बातमी
इतर बातम्या