Advertisement

‘अॅट्रॉसिटी’ २३ फेब्रुवारीला चित्रपटगृहात


‘अॅट्रॉसिटी’ २३ फेब्रुवारीला चित्रपटगृहात
SHARES

‘अॅट्रॉसिटी’ हे एका कायद्याचं नाव असल्याचं आपल्याला माहीत असेलच. पण प्रत्यक्षात   अॅट्रॉसिटी कायदा म्हणजे काय?, या कायद्याचा उपयोग काय? याची माहिती फार कमी लोकांना आहे. यामुळे चित्रपटाच्या माध्यमातून या कायद्याची माहिती प्रेक्षकांना सहज सोप्या भाषेत समजवण्याचा प्रयत्न निर्माते डॉ. राजेंद्र पडोळे आणि दिग्दर्शक दिपक कदम यांनी केला आहे. आर. पी प्रोडक्शनची प्रस्तुती असलेला ‘अॅट्रॉसिटी’ हा चित्रपट २३ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

चित्रपटाची कथा?


कायदे बनतात आणि त्यातून बचावासाठी पळवाटाही काढल्या जातात, पण ज्यांच्यासाठी कायदे बनतात त्यांना मात्र त्याबाबत फारशी माहिती नसते. ‘अॅट्रॉसिटी’ हा देखील एक असाच कायदा आहे, ज्याबाबत समाजात विशेष जागृती नाही. त्यामुळे समाजातील ज्या दुर्बल घटकांसाठी हा कायदा बनवण्यात आला ते याचा उपभोग घेऊ शकत नाही. अशा घटकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने या कायद्यावर प्रकाशझोत टाकताना या कायद्याचा केला जाणारा दुरुपयोग यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे.


यांच्या महत्त्वाच्या भूमिका

गीतकार अनंत जाधव, मंदार चोळकर, अखिल जोशी, विजय के. पाटील यांनी‘ अॅट्रॉसिटी’ मधील गाणी लिहिली आहेत. तर संगीतकार अमर-रामलक्ष्मण यांनी या चित्रपटातील गाणी स्वरबद्ध केली आहे. आनंदी जोशी, वैशाली सामंत, जान्हवी प्रभू-अरोरा, शशिकांत मुंबारे, नंदेश उमप, सौरभ पी. श्रीवास्तव या गायकांचा आवाजही या चित्रपटाची जमेची बाजू आहे. 

राजन सुर्वे आणि मंगेश केदार यांनी या चित्रपटाची पटकथा-संवाद लिहिले आहेत. यतिन कार्येकर, लेखा राणे, गणेश यादव, विजय कदम, सुरेखा कुडची, डॉ, निशिगंधा वाड, कमलेश सुर्वे, राजू मोरे, ज्योती पाटील, शैलेश धनावडे, निखिल चव्हाण या अनुभवी कलाकारांच्या जोडीला ऋषभ पडोळे आणि पूजा जैसवाल ही नवी जोडी या चित्रपटात असणार आहे. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा