सुप्रसिद्ध अभिनेता रजनीकांत, मार्शल आर्ट्स स्पेशालिस्ट अभिनेता अक्षय कुमार आणि ब्रिटिश अभिनेत्री अॅमी जॅकसन यांच्या 2.0 या आगामी सिनेमाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. शुक्रवारी संध्याकाळी दुबईच्या बुर्ज पार्कमध्ये दिग्दर्शक एस शंकर यांच्या उपस्थितीत या सिनेमाचा दिमाखदार म्युझिक लाँच सोहळा पार पडणार आहे. मात्र त्याआधी सिनेमाच्या लोकप्रियतेमध्ये भर पडावी आणि चाहत्यांची 2.0ची उत्सुकता अजून वाढावी म्हणून सोशल मीडियावर सिनेमाचं पोस्टर लाँच करण्यात आलं आहे.
ए. आर. रेहमान यांनी संगीतबद्ध केलेल्या तीन गाण्यांचं लाँच दुबईच्या बुर्ज पार्कमध्ये होणार आहे. यातली दोन गाणी या कार्यक्रमात सादर केली जाणार आहेत. ए. आर. रेहमान स्वत: यावेळी गाणी लाईव्ह परफॉर्म करणार आहेत.
या सोहळ्याच्या काही तास आधीच सिनेमाचं एक नवीन पोस्टर ट्विटरवर लाँच करण्यात आलं आहे. यामध्ये अभिनेता रजनीकांत आणि अॅमी जॅकसन गोल्डन कलरच्या वेशभूषेमध्ये अॅग्रेसिव्ह लुकमध्ये दिसत आहेत. तर त्यांच्याच वर अक्षय कुमारचे फक्त डोळे दिसत आहेत. या पोस्टरमुळे चाहत्यांची सिनेमाविषयीची उत्सुकता अधिकच ताणली गेली आहे.
पोस्टरमुळे सिनेमाची उत्सुकता वाढली असली, तरी आता सगळ्यांचं लक्ष दुबईतल्या बुर्ज पार्कमध्ये होणाऱ्या म्युझिक लाँच सोहळ्याकडे लागलं आहे. या सोहळ्याला दिग्दर्शक एस शंकर, अभिनेता अक्षय कुमार, अॅमी जॅकसन, रजनीकांत यांच्यासोबतच आर. जे. बालाजी, राणा डग्गुबती आणि दिग्दर्शक करण जोहर यांची उरस्थिती असणार आहे. या सोहळ्याच्या तयारीसाठी सुमारे 12 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची चर्चा आहे.
हेही वाचा