नवाजुद्दीन सिद्दीकीला अखेर त्याची 'किंमत' कळली!

'गँग्स ऑफ वासेपूर' आणि 'गँग्स ऑफ वासेपूर-2' या दोन सिनेमांमधून प्रसिद्धीच्या नव्या शिखरावर पोहोचलेल्या नवाजुद्दीन सिद्दीकीला अखेर त्याची किंमत कळली आहे! आम्ही हे म्हणतोय याचा अर्थ नवाजुद्दीन सिद्दीकीला कोणताही मोक्षं किंवा सिद्धी मिळालेली नसून त्याने प्रत्येक सिनेमासाठी आकारायचं स्वत:चं 'मानधन' वाढवलंय.

  • नवाजुद्दीन सिद्दीकीला अखेर त्याची 'किंमत' कळली!
  • नवाजुद्दीन सिद्दीकीला अखेर त्याची 'किंमत' कळली!
  • नवाजुद्दीन सिद्दीकीला अखेर त्याची 'किंमत' कळली!
  • नवाजुद्दीन सिद्दीकीला अखेर त्याची 'किंमत' कळली!
SHARE

'गँग्स ऑफ वासेपूर' आणि 'गँग्स ऑफ वासेपूर-2' या दोन सिनेमांमधून प्रसिद्धीच्या नव्या शिखरावर पोहोचलेल्या नवाजुद्दीन सिद्दीकीला अखेर त्याची किंमत कळली आहे! आम्ही हे म्हणतोय याचा अर्थ नवाजुद्दीन सिद्दीकीला कोणताही मोक्षं किंवा सिद्धी मिळालेली नसून त्याने प्रत्येक सिनेमासाठी आकारायचं स्वत:चं 'मानधन' वाढवलंय. आता या बातमीमध्ये किती तथ्य आहे हे तर स्वत: नवाजच सांगू शकेल. पण जर असं झालं असेल, तर ते योग्यच म्हणावं लागेल.'गँग्स ऑफ वासेपूर' आणि त्यानंतर नवाजुद्दीन सिद्दीकीने केलेले अनेक चित्रपट हे त्याच्यातला कलाकार आणि हाडाचा अभिनेता लोकांसमोर आणणारे ठरले. त्यातले काही सिनेमे हे फ्लॉ़प जरी झाले असले, तरी त्यातून नवाजने प्रत्येक वेळी त्याची अशी वेगळी छाप सोडली आहे. मग तो 'मांझी' असो, 'बजरंगी भाईजान' असो, रईस असो किंवा मग 'बाबूमोशाय बंदूकबाज' असो. 
प्रत्येक सिनेमा आणि त्यातल्या प्रत्येक भूमिकेला न्याय देण्याचा नवाजनं नेहमीच प्रयत्न केला आहे. आणि तो प्रयत्न यशस्वीही ठरला असल्याची पावती सिनेपरीक्षकांनी वेळोवेळी दिली आहे. आणि त्याच आधारावर नवाजनं त्याचं मानधन वाढवणं हे रास्तच असल्याची प्रतिक्रिया येऊ लागली आहे.अगदी पहिल्या चित्रपटापासून नवाजुद्दीन सिद्दीकीनं प्रतिसिनेमा मानधनं तितकंच ठेवलं होतं. मात्र त्याचवेळी त्याच्यासोबतच्या अनेक कलाकार अभिनेत्यांनी त्यांच्या मानधनामध्ये अव्वाच्या सव्वा वाढ केल्याचं दिसून आलं. त्यामुळे नवाजनं जर त्याची 'खरी किंमत' ओळखून ती वाढवली असेल, तर ती रास्तच असल्याची चर्चा बॉलिवूडसह त्याच्या चाहत्यांमध्ये सुरु आहे.'हरामखोर' या सिनेमासाठी नवाजुद्दीन सिद्दीकीनं अवघा एक रूपया मानधन घेतलं असल्याची चर्चा होती. त्याला सिनेमाची कथा आवडल्यामुळे स्वखुशीनेच त्याने 1 रुपया मानधन घेतलं. मात्र आता त्यानं एका सिनेमासाठी सुमारे 4 ते 5 कोटी रुपये आकारायला सुरुवात केल्याची माहिती सूूत्रांनी दिली आहे. शिवाय, कोणत्याही कार्यक्रमात उपस्थित रहाण्यासाठीचं मानधनही त्यानं वाढवल्याचं बोललं जात आहे.हेही वाचा

'बाहुबली' फेम प्रभासच्या 'साहो' सिनेमाचा पोस्टर रिलीज


संबंधित विषय
ताज्या बातम्या