'हरामखोर'ची सक्सेस पार्टी

 Pali Hill
'हरामखोर'ची सक्सेस पार्टी
Pali Hill, Mumbai  -  

मुंबई - मागील चार वर्षापासून सेन्सॉर बोर्डाच्या समीक्षा समितीमुळे 'हरामखोर' या सिनेमाचं प्रदर्शन लांबणीवर पडलं होतं. मात्र आता या सिनेमाला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली आहे. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी आणि श्वेता त्रिपाठींनी अभिनय केलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन श्लोक शर्मा यांनी केलं आहे. मागच्या आठवड्यात सिनेमागृहात प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे.

या वेळी 'हरामखोर'च्या सक्सेस पार्टीत प्रसार माध्यमांशी बोलताना नवाजुद्दीन सिद्दिकीने सांगितलं की या सिनेमाने चांगली कामगिरी केली असून आपण खूप खूश आहोत. मोठ्या बजेटचे भारतीय शैलीचे चित्रपटही चांगली कामगिरी करू शकतात हे यावरून स्पष्ट झाल्याचंही तो म्हणाला.

Loading Comments