Advertisement

'बाहुबली' फेम प्रभासच्या 'साहो' सिनेमाचा पोस्टर रिलीज


'बाहुबली' फेम प्रभासच्या 'साहो' सिनेमाचा पोस्टर रिलीज
SHARES

बाहुबली फेम अभिनेता प्रभास याने त्याच्या फेसबुक अकाऊंटवर त्याच्या आगामी सिनेमा साहोचा पहिला पोस्टर रिलीज केला आहे. सोमवारी त्याच्या 38 व्या वाढदिवसाच्या दिनी त्याने हा पोस्टर रिलीज केला.

या पोस्टरमध्ये प्रभासने ओवर कोट घातला आहे. त्याचे तोंड झाकले असून तो रस्त्यावरून चालत आहे. बाहुबली-2 या सिनेमासोबतच साहो या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला होता. ज्यानंतर प्रभासचे चाहते आता त्याच्या साहो या सिनेमाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहात आहेत. या सिनेमात श्रद्धा कपूर, नील नितिन मुकेश, जॅकी श्रॉफ, चंकी पांडे आणि मंदिरा बेदी यांची भूमिका असेल. साहोमध्ये जॅकी आणि चंकी हे दोघेही खलनायकाच्या भूमिकेत दिसतील.


या सिनेमाच्या चित्रिकरणासाठी 150 कोटी खर्च करण्यात आल्याची चर्चा आहे. बाहुबली 2 या सिनेमात अनुष्का आणि प्रभास या जोडीला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली होती. यानंतर आता प्रेक्षक पुन्हा एकदा पडद्यावर ही जोडी पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा