चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान 'या' दोन अभिनेत्यांना कोरोनाची लागण

नेल पॉलिश चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोन अभिनेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. अभिनेता अर्जुन रामपालही (arjun rampal) होम क्वारंटाइन झाला आहे. यासंदर्भात अभिनेता अर्जुन रामपालनं आपल्या ट्वीटवर अकाऊंटर एक पोस्ट केली आहे.

अर्जुननं आपला घरातील फोटो शेअर करत. आपल्या दोन सह अभिनेत्यांना कोरोना संक्रमण झाल्याचं सांगितलं आहे. मानव कौल (manav kaul) आणि आनंद तिवारीला (anand tiwari) कोरोना झाला आहे.

अर्जुन रामपालनं ट्विटरवर लिहलं की, नेल पॉलिशच्या सेटवर मानव कौल आणि आनंद तिवार कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं निदान झालं. प्रोडक्शननं फिल्मचं शूटिंग तात्काळ थांबवलं आहे आणि सर्व जण आता आराम करत आहे. मी माझ्या घरातच क्वारंटाइन आहे. आता माझ्या रिपोर्टची प्रतीक्षा करतो आहे. सर्वांपासून दूर राहत आहे.

आई माझी काळूबाई आणि अग्गंबाई सासूबाई मालिकेतल्या कलाकारांनाही कोरोनाची लागण झाली. आई माझी काळूबाई २७ जणांना कोरोनाची झाला. या मालिकेतील अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर अग्गंबाई सासूबाई मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री निवेदिता सराफ यांनाही कोरोना झाल्याची माहिती मिळते आहे.

निवेदिता यांच्यामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत. त्यांनी स्वत:ला घरातच क्वारंटाईन केलं आहे. निवेदिता यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याचं समजताच मालिकेच्या सेटवरील सर्वांची कोरोना टेस्ट करण्यात आली.

इतर कलाकारांचीही चाचणी झाली. या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणारे डॉ. गिरीश ओक, आशुतोष पत्की, तेजश्री प्रधान यांचाही कोरोना रिपोर्ट आला आहे. त्यांचा अहवाल नेगेटिव्ह असल्याचं समजतं आहे.


हेही वाचा

नवाझुद्दिनच्या अडचणीत वाढ, पत्नीकडून पोलिसात तक्रार दाखल

निवेदिता सराफ यांना कोरोनाची लागण, 'अग्गबाई सासूबाई' मालिकेतील इतर कलाकार...

पुढील बातमी
इतर बातम्या