Advertisement

नवाझुद्दिनच्या अडचणीत वाढ, पत्नीकडून पोलिसात तक्रार दाखल

नवाजची पत्नी आलिया सिद्दीकी उर्फ अंजना किशोर पांडेनं लेखी तक्रार दाखल करून त्याच्यावर बलात्कार आणि फसवणुकीचा आरोप केला आहे.

नवाझुद्दिनच्या अडचणीत वाढ, पत्नीकडून पोलिसात तक्रार दाखल
SHARES

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या अडचणीत आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे. नवाजची पत्नी आलिया सिद्दीकी उर्फ अंजना किशोर पांडेनं लेखी तक्रार दाखल करून त्याच्यावर बलात्कार आणि फसवणुकीचा आरोप केला आहे. याबाबतची तक्रार मुंबईतील वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकीनं याप्रकरणी अद्याप कुठलीच प्रतिक्रिया दिली नाही. पण नवाजुद्दीनचा भाऊ शम्सनं हे आरोप फेटाळले आहेत. आलिया सर्व पैशासाठी करत आहे, असा आरोप त्यानं केला आहे. शम्सवर देखील आलियानं छेडछाड केल्याचा आरोप केला होता.

आलियाचे वकील अदनान शेख यांनी एक निवेदन जारी केलं आहे की, "माझ्या क्लायंटनं वर्सोवा पोलिस ठाण्यात बलात्कार आणि फसवणुकीबद्दल सविस्तर लेखी तक्रार दाखल केली आहे. लवकरच एफआयआर दाखल होईल अशी अपेक्षा आहे.'

२७ जुलै रोजी आलियानं मुंबईच्या वर्सोवा पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. त्यात तिनं नवाजसह त्याची आई आणि ३ भावांवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. हे प्रकरण मुंबईतील नसल्या कारणानं ही तक्रार उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरच्या बुढाना येथे हस्तांतरित करण्यात आली होती.

कोविड -19 लॉकडाऊनपासून नवाजुद्दीन सिद्दीकी बुढाना इथं आपल्या मूळ गावी आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलियानं मुंबईत तक्रार दाखल केल्यानंतर नवजाच्या कुटुंबीयांच्या वतीनं त्याचा भाऊ फैजुद्दीन सिद्दीकीनं स्पष्टीकरण दिलं होतं. आलिया आणि आपला भाऊ नवाजुद्दीनचा घटस्फोट झाला असून तिनं आपल्या कुटुंबावर खोटे आरोप केल्याचं त्यानं म्हटलं होतं.हेही वाचा

निवेदिता सराफ यांना कोरोनाची लागण, 'अग्गबाई सासूबाई' मालिकेतील इतर कलाकार...

बदनाम बॉलीवूड

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement