Advertisement

अनुराग कश्यपला 'या' दोन बायकांनी दिला पाठिंबा

अनुरागच्या पुर्वाश्रमीच्या पत्नी आरती बजाज आणि कल्कि कोचलिन या देखील त्याला पाठिंबा देताना दिसत आहेत.

अनुराग कश्यपला 'या' दोन बायकांनी दिला पाठिंबा
SHARES

बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपवर पायल घोष नावाच्या अभिनेत्रीनं लैंगिक छळाचा आरोप केला आहे. हे प्रकरण २०१४ चं असल्याचं तिचं म्हणणं आहे. अनुरागनं विवस्त्र होऊन आपल्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप पायलनं केला आहे.

अनुरागनं मात्र त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आता अनुरागच्या पुर्वाश्रमीच्या पत्नी आरती बजाज आणि कल्कि कोचलिन या देखील त्याला पाठिंबा देताना दिसत आहेत.

२००३ मध्ये अनुरागचं लग्न आरती बजाजसोबत झालं होतं. तर २००९ मध्ये दोघे विभक्त झाले. त्यानंतर २०११ मध्ये अनुरागनं अभिनेत्री कल्कि कोचलिनसोबत दुसरं लग्न केलं. मात्र २०१५ मध्ये हे नातेदेखील संपुष्टात आले. या दोघींनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अनुरागचं समर्थन केलं आहे.

ट्रोल्स tho ट्रॉल करेंगें म्हणत कल्किनं लिहलं की, "प्रिय अनुराग. ही सोशल मीडियाची सर्कस तुझ्यापर्यंत येऊ देऊ नकोस. तू नेहमी आपल्या चित्रपटांच्या स्क्रिप्ट्समधून महिलांच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला आहे. तू खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यातही महिलांचा सन्मान राखला आहे. मी याची साक्षीदार आहे. कारण तू मला नेहमी खासगी आणि कामात आपल्या बरोबरीची, समान जागा दिलीस. तू घटस्फोटानंतरही माझा सन्मान राखला, माझ्यासाठी नेहमी हजर होतास."

ती पुढे लिहिते, 'ही वेळ खूप विचित्र आहे. प्रत्येक जण एकमेकांवर खोटे आरोप करतोय. कुटुंबं, मित्र आणि देश उद्धवस्त करत आहेत. मात्र या व्हर्चुअल रक्तरंजित संघर्षाशिवाय एक जग आहे, जिथं गौरव महत्त्वाचा आहे. यावेळी तुला मजबूत राहण्याची गरज आहे आणि तू जे काम करत आहेस ते करत राहा.'

दुसरीकडे रविवारी अनुरागची पहिली पत्नी आरती बजाजने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत अनुराग कश्यपला पाठिंबा दर्शवला होता. 'तू रॉकस्टार असून महिला सबलीकरणासाठी करतोस ते काम करत राहा. जर प्रत्येकानं आपली एनर्जी योग्य ठिकाणी वापरली तर जग एक सुंदर जागा होईल.'हेही वाचा

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांना कोरोनाची लागण, प्रकृती चिंताजनक

अभिनेत्री रकुलप्रित सिंगची मीडियाविरोधात उच्च न्यायालयात धाव

संबंधित विषय
Advertisement