Advertisement

अभिनेत्री रकुलप्रित सिंगची मीडियाविरोधात उच्च न्यायालयात धाव

रकुलप्रितनं आपली प्रतिमा खराब केल्याचा आरोप करत, उच्च न्यायालयात धाव घेतली.

अभिनेत्री रकुलप्रित सिंगची मीडियाविरोधात उच्च न्यायालयात धाव
SHARES

अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूच्या चौकशीत ड्रग्स कनेक्शन समोर आल्यानंतर नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोनं (एनसीबी) अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक केली. त्यानंतरच या प्रकरणात रकुलप्रित सिंगचं नाव मीडियात घेतलं गेलं. पण यावरून रकुलप्रित सिंग मीडियावर चांगलीच नाराज झाली आहे.

रकुलप्रितनं आपली प्रतिमा खराब केल्याचा आरोप करत, दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. ज्यामध्ये तिनं मीडिया ट्रायल थांबवण्याची विनंती केली आहे. रकुलनं वकिलांमार्फत सांगितलं की, सुशांत प्रकरणात तिच्याविरोधात मीडिया ट्रायल चालवलं जात आहे. सुशांत प्रकरणात ड्रग्स कनेक्शन समोर आल्यापासून माझं नाव जोडलं जात आहे. माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांचं हे एकप्रकारे उल्लंघन आहे.

रिपोर्ट्सनुसार, रकुल म्हणाली, "शूटिंग दरम्यान मला कळाले की, रियानं ड्रग्स प्रकरणात माझं आणि साराचं नाव घेतलं आहे. त्यानंतरच माझा माध्यमांमध्ये बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मला एकप्रकारे आरोपी म्हणून दाखवलं जात आहे. आता ही बाब कुटुंबीयांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे असे मीडिया ट्रायल थांबवले पाहिजेत.”

रकुलच्या या याचिकेनंतर न्यायमूर्ती नवीन चावला यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय प्रसार भारती आणि प्रेस काऊन्सिल ऑफ इंडिया यांना नोटीस बजावून उत्तर मागितले आहे.

उच्च न्यायालयानं सर्व अधिकाऱ्यांना रकुल यांच्या याचिकेचं प्रतिनिधित्व म्हणून विचार करण्यास सांगितलं आणि पुढील सुनावणीच्या अगोदर म्हणजे १५ ऑक्टोबर रोजी निर्णय घेण्यास सांगितलं. त्याशिवाय रकुलशी संबंधित बातम्यांबाबत संयम राखण्यासही कोर्टानं माध्यमांना सांगितलं आहे.

रिपोर्ट्सनुसार, ड्रग्ज प्रकरणी चौकशी दरम्यान रियानं एनसीबीला असं सांगितलं होतं की, यामध्ये २५ मोठ्या स्टारची नावं आहे. अशा परिस्थितीत या २५ सेलिब्रिटींमध्ये सारा अली खान, रकुलप्रीत सिंग, मुकेश छाब्रा, रोहिणी अय्यर आणि सायमन खंबाटा यांची नाव असल्याची चर्चा आहे. पण यावर एनसीबीनं अशी कुठलीच नावं रियानं सांगितली नसल्याचा खुलासा केला होता.



हेही वाचा

कंगना म्हणते, उर्मिला मातोंडकर सॉफ्ट पॉर्न स्टार

राम गोपाल वर्मांनी केली स्वत:च्या बायोपिकची घोषणा, चित्रपट ठरणार वादग्रस्त?

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा