Advertisement

कंगना म्हणते, उर्मिला मातोंडकर सॉफ्ट पॉर्न स्टार

अभिनेत्री उर्मिला मातोंडकरनं देखील याप्रकरणावर आपलं मत व्यक्त केलं. पण आता कंगना रणौतनं उर्मिला मातोंडकरवर खालच्या दर्जाची टिका केली आहे.

कंगना म्हणते, उर्मिला मातोंडकर सॉफ्ट पॉर्न स्टार
SHARES

सुशांतसिंग राजपूतच्या निधनानंतर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत फिल्म इंडस्ट्रीला लक्ष्य करीत आहे. अशा परिस्थितीत अलीकडेच जया बच्चन यांनी बॉलिवूडवर लावल्या जात असलेल्या आरोपांविषयी चिंता व्यक्त केली. त्यानंतर अभिनेत्री उर्मिला मातोंडकरनं देखील याप्रकरणावर आपलं मत व्यक्त केलं. पण आता कंगना रणौतनं उर्मिला मातोंडकरवर टिका केली आहे.

कंगना रणौतनं उर्मिला मातोंडकरला सॉफ्ट पॉर्न म्हटलं आहे. अलीकडेच टाईम्स नाऊशी बोलताना कंगना म्हणाली, "मी उर्मिला मातोंडकर यांची अपमानास्पद मुलाखत पाहिली. थट्टा करत असताना ती माझ्या बॉलिवूडमधील धडपडीची चेष्टा करत होती. ती संपूर्ण मुलाखतीत मला वेडावून दाखवत होती."

कंगना पुढे म्हणाली, "त्यांनी माझ्यावर आरोप केला आहे की, मी BJP ला खूश करण्यासाठी हे सर्व करत आहे. पण तिकीट मिळवण माझ्यासाठी काही कठिण नाही."

कंगना पुढे म्हणाली, "उर्मिला मातोंडकर एक सॉफ्ट पॉर्न स्टार आहे. मला माहित आहे की, या वक्तव्यावरून माझ्यावर खूप टिका केली जाईल. परंतु ती नक्कीच तिच्या अभिनयासाठी ओळखली जात नाही. ती कशासाठी ओळखली जाते? तर ती सॉफ्ट पॉर्नसाठी ओळखली जाते"

अभिनेत्री म्हणाली, "जर उर्मिलाला तिकीट मिळू शकत तर मला का नाही? कोणालाही तिकीट मिळू शकेल. सर्वांना तिकीट दिले जाऊ शकते."

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत उर्मिलानं कंगनाला विचारलं होतं की, ती मादक पदार्थांबद्दल पोलिसांना का माहिती देत नाही? जर कंगना हिंदी चित्रपटसृष्टीत ड्रग्सच्या वापराविषयी बोलत असेल तर तिनं तिच्या गृह राज्य हिमाचल प्रदेशपासून सुरुवात करावी. केवळ हिमाचल प्रदेशातच औषधांची निर्मिती केली जाते हे कंगनाला माहित आहे का?

उर्मिलानं कंगनाच्या POK वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती. तिनं म्हटलं होतं की, मुंबई सर्वांचीच आहे आणि त्यासाठी कोणताही अपमानजनक शब्द ते सहन करणार नाहीत. जर एखादी व्यक्ती सर्व वेळ ओरडत असेल तर याचा अर्थ असा नाही की ती बरोबर आहे. काही लोक ओरडतात आणि विक्टिम कार्ड खेळतात आणि जर ते कामी येत नसेल तर ते महिला कार्ड वापरतात.

जया बच्चन यांच्या चर्चेवर उर्मिला म्हणाली की, कंगनाचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून जयाजी चित्रपटसृष्टीत आहेत.हेही वाचा

जया बच्चन यांच्या चारही बंगल्याची सुरक्षा वाढवली, बिग बींनी ट्विटरवर दर्शवला पाठिंबा

संजय दत्त मुंबईतून अचानक परदेशी रवाना

संबंधित विषय
Advertisement