Advertisement

संजय दत्त मुंबईतून अचानक परदेशी रवाना

संजय दत्त (Sanjay Dutt) आपल्या पत्नी मान्यता दत्त (Manyata Dutt)सह १५ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ४ वाजता मुंबईतून रवाना झाला आहे.

संजय दत्त मुंबईतून अचानक परदेशी रवाना
SHARES

फुप्फुसाच्या कर्करोगावर मुंबईत उपचार घेतल्यानंतर बॉलिवूड अभिनेता संजय दत्त आपल्या पत्नीसह दुबईला रवाना झाला आहे. संजय दत्त (Sanjay Dutt) ला चौथ्या स्टेजचा फुप्फुसाचा कर्करोग झाला आहे.

११ ऑगस्ट रोजी संजय दत्तला कर्करोग झाल्याचं निदान झालं होतं. त्यानंतर त्याच्यावर मुंबईतील हॉस्पिटलमध्ये किमोथेरपीचा पहिली टप्पा पूर्ण केला. आता संजय दत्त आपल्या पत्नीसह परदेशात रवाना झाला आहे.

संजय दत्त (Sanjay Dutt) आपल्या पत्नी मान्यता दत्त (Manyata Dutt)सह १५ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ४ वाजता मुंबईतून दुबईला रवाना झाला. टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, मुलं शहरान आणि इकरा संजय दत्तला भेटण्यासाठी आतूर झाली आहेत. त्यांना भेटण्यासाठी संजय दत्त दुबईला रवाना झाला. पुढील ७ ते १० दिवस ते दुबईत राहणार आहेत. त्यानंतर ते पुन्हा मुंबईत परतणार आहे.

काही दिवसांपूर्वी संजय दत्त (Sanjay Dutt) नं स्वत: आपल्याला फुप्फुसांचा कर्करोग झाल्याचे सोशल मीडियावर सांगितलं होतं. श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं त्याला लिलावती रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. यावेळी त्याची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली होती. मात्र त्याला फुप्फुसांचा कर्करोग झाल्याचं निदान झालं. कर्करोगाचे निदान झाल्यामुळे संजय दत्तनं बॉलिवूडमधून कामासाठी ब्रेक घेतला होता.

मात्र एक आठवड्यापूर्वी संजय दत्तनं चित्रपटाच्या शूटिंगला हजेरी लावली होती. आजारी असला तरी संजू त्याच्याकडे असलेल्या चित्रपटांचं शूटिंग पूर्ण करत आहे. कारण पुढिल उपचारासाठी तो अमेरिकेत जाणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे हातात असलेल्या चित्रपटांचं शूटिंग पूर्ण झालं की तो अमेरिकेला पुढच्या उपचारासाठी रवाना होईल.



हेही वाचा

राम गोपाल वर्मांनी केली स्वत:च्या बायोपिकची घोषणा, चित्रपट ठरणार वादग्रस्त?

मनीष मल्होत्राच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई कधी?

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा