Advertisement

मनीष मल्होत्राच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई कधी?

फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या घरात देखील अनधिकृत बांधकाम केल्याचं समोर आलं. पण एक आठवडा झाला तरी पालिकेनं मनीष मल्होत्राला नोटीस देखील बजावली नाही.

मनीष मल्होत्राच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई कधी?
SHARES

अभिनेत्री कंगना रणौतच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर पालिकेनं कारवाई केली. मात्र आता यानंतर इतर अनधिकृत बांधकामावर कधी कारवाई होणार असाच प्रश्न समोर आला.

त्यातच फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या घरात देखील अनधिकृत बांधकाम केल्याचं समोर आलं. पण एक आठवडा झाला तरी पालिकेनं मनीष मल्होत्राला नोटीस देखील बजावली नाही. त्यामुळे सर्वत्र चर्चा होत आहे.  

मनीष मल्होत्रा या फॅशन डिझायनरनं देखील स्घवत:च्या घराचे कार्यालयात रुपांतर केले आहे. कंगनाच्या घराची पाहणी केली त्याच दिवशी पथकानं वांद्रे (पश्चिम) मधील पाली हिल इथं असलेल्या मनीष मल्होत्राच्या घराची पाहणी केली होती. कारण मनीष मल्होत्रा कंगना रणौतच्या शेजरीच राहत असल्याचं बोललं जातंय. 

अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत आढळलं की, पहिल्या मजल्यावरील व्यावसायिक वापरासाठी निवासी घरात अनधिकृत बदल, पहिल्या मजल्यावरील विभाजनांचे अनधिकृत बांधकाम, भिंतीचे अनधिकृत बांधकाम आणि त्यावर सिमेंट शीटचे छप्पर. दुसर्‍या मजल्यावरील टेरेस आणि त्याच गच्चीवर शेडचे  बांधकाम असं अनधिकृत बांधकाम आढळून आलं. 

दुसरीकडे, मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या कलमाअंतर्गत पालिकेनं कंगना रणौतला 'स्टॉप वर्क नोटीस' बजावली होती. शिवाय २४ तासात उत्तर देण्यास सांगितलं होतं. पण दिलासादायक उत्तरं मिळाली नाहीत अंस पालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे पालिकेनं कंगनाच्या कार्यालयावर हातोडा मारला. 

तथापि, मल्होत्राच्या बाबतीत, पालिकेनं ७ सप्टेंबर रोजी नोटीस तयार केली होती. परंतु आतापर्यंत त्यांना ती पाठविली नसल्याचं सांगितलं जातंय. हेही वाचा

कंगनाच्या हाऊसिंग सोसायटीलाही बीएमसीची नोटीस

कंगनाचा महापालिकेविरोधात २ कोटीचा दावा

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement