Advertisement

कंगनाच्या हाऊसिंग सोसायटीलाही बीएमसीची नोटीस

पालिकेने कंगनाच्या हाऊसिंग सोसायटीला नोटीस बजावली आहे. कंगनाचे घर असलेल्या चेतक सोसायटीकडं पालिकने या नोटिसीतून ५ प्रश्नांची उत्तरं मागितली आहेत.

कंगनाच्या हाऊसिंग सोसायटीलाही बीएमसीची नोटीस
SHARES

अभिनेत्री कंगना रणौत हिच्या पाली हिल कार्यालयातील अनाधिकृत बांधकाम मुंबई महापालिकेने नुकतंच तोडलं आहे. त्यानंतर आता पालिकेने कंगनाच्या हाऊसिंग सोसायटीला नोटीस बजावली आहे.  कंगनाचे घर असलेल्या चेतक सोसायटीकडं पालिकने या नोटिसीतून ५ प्रश्नांची उत्तरं मागितली आहेत. कंगनाचं कार्यालय तोडल्याच्या ६ दिवसानंतर नोटीस बजावून पालिका प्रशासन आता तिच्या सोसायटीतसुद्धा तोडफोड करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सोसायटीचे प्रमुख, सदस्य आणि पार्टनर्सची यादी, गेल्या ३ वर्षांत सोसायटीच्या बैठका आणि बँक खात्यांचा तपशील, निवडणूक प्रक्रियेत सदस्यांची ट्रान्सफर लिस्ट, रेल हाउस आणि बंगल्यांच्या मंजुरीचा तपशील आणि करारासह इतर कागदपत्रांची माहिती महापालिकेने चेतक सोसायटीकडं मागितली आहे.

दरम्यान, मंगळवारी कंगनाने मुंबई महापालिकेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात २ कोटी रुपयांचा दावा केला आहे. मुंबईतील कार्यालयावर केलेल्या कारवाईनंतर कंगनाने पालिकेविरोधात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणावर २२ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

महानगरपालिकेने बंगल्याच्या एकूण मालमत्तेपैकी ४० टक्के मालमत्तेचे नुकसान केल्याचा दावा कंगनाने केला.  कंगनाला वांद्रे येथील तिच्या कार्यालयात अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी मंगळवारी मुंबई महानगरपालिका कायद्यातील कलम ३५४ (अ) नुसार नोटीस बजावण्यात आली होती. त्यावर उत्तर देण्यासाठी कंगनाला २४ तासांची मुदत देण्यात आली होती. पण तिच्याकडून कोणतेही उत्तर न आल्याने पालिकेकडून बुधवारी सकाळी तिथे बांधकाम पडण्यास सुरुवात करण्यात आली.



हेही वाचा -

कंगनाचा महापालिकेविरोधात २ कोटीचा दावा

"गळफास घेतलेल्या अवस्थेत अभिषेक आढळला तर?" कंगनाचा जया बच्चन यांना प्रश्न



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा