Advertisement

"गळफास घेतलेल्या अवस्थेत अभिषेक आढळला तर?" कंगनाचा जया बच्चन यांना प्रश्न

जया बच्चन (Jaya Bachchan) यांनी रवी किशन यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. त्यावर अभिनेत्री कंगना रणौत भडकली आहे.

"गळफास घेतलेल्या अवस्थेत अभिषेक आढळला तर?" कंगनाचा जया बच्चन यांना प्रश्न
SHARES

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भाजपा खासदार आणि अभिनेता रवी किशन (Ravi Kishan) यांनी बॉलिवूडवर निशाणा साधला. त्यावर समाजवादी पार्टीच्या राज्यसभा खासदार जया बच्चन (Jaya Bachchan) यांनी रवी किशन यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. त्यांचे वक्तव्य ऐकल्यानंतर अभिनेत्री कंगना रणौत भडकली आहे. तिने ट्वीट करत बच्चन यांच्यावर निशाणा साधला आहे.

कंगना रणौतनं ट्वीट केलं आहे की, 'जया जी, जर मी तुमची मुलगी श्वेता असते आणि टीनएजमध्ये तिला मारले असते, ड्रग दिले असते आणि तिच्याबरोबर छेडछाड झाली असती, तरी देखील तुम्ही असंच म्हटलं असतं का? जर अभिषेकनं सातत्यानं गुंडगिरी आणि छळवणूक केल्याबद्दल तक्रार केली असती आणि एक दिवस गळफास घेतलेला आढळला असता तरी देखील तुम्ही असंच म्हटलं असतं का? आमच्याबद्दलही दया दाखवा'.

सोमवारी रवी किशन यांनी इंडस्ट्रीतील वाढत्या ड्रग कनेक्शनबाबत चिंता व्यक्त केली होती. उत्तर प्रदेशमधील भाजपचे खासदार रवी किशन यांनी सुशांत सिंह राजपूत तपासात फिल्म इंडस्ट्रीवर उद्भवलेल्या ड्रग्ज-संबंधी आरोपाबाबत काही प्रश्न संसदेत उपस्थित केले. पाकिस्तान आणि चीननं देशातील तरूणांना संपुष्टात आणण्यासाठी कट रचल्याचा आरोप त्यांनी केला. दोषींवर कारवाई करत परकीय देशाचा कट संपवण्याची मागणी त्यांनी केली होती.

त्यावर जया बच्चन यांनी ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूडच्या होणाऱ्या बदनामीबाबत चिंता व्यक्त केली. जया बच्चन यांनी असं म्हटलं की, 'लोक बॉलिवूडला बदनाम करण्याच्या प्रयत्नात आहेत. काही दिवसांपासून बॉलिवूडला बदनाम केलं जात आहे. फक्त काही लोकांमुळे तुम्ही संपूर्ण इंडस्ट्रीवर कलंक ठेवू शकत नाही. मला खरोखर लाज वाटली की काल लोकसभेतील एक सदस्य, जे इंडस्ट्रीत आहेत, त्यांनी फिल्म इंडस्ट्रीविरूद्ध भाषण केलं.'हेही वाचा

Alexa वर घुमणार बॉलिवूडच्या शहनशाहाचा आवाज

सगळ्या गँगशी आदित्य ठाकरे यांची जवळीक, कंगना रणौतचा आरोप

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement