Advertisement

जया बच्चन यांच्या चारही बंगल्याची सुरक्षा वाढवली, बिग बींनी ट्विटरवर दर्शवला पाठिंबा

अमिताभ बच्चन हे जया बच्चन यांच्या समर्थनार्थ आले आहेत. अमिताभ यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये ट्रोलर्सना प्रत्युत्तर दिलं आहे.

जया बच्चन यांच्या चारही बंगल्याची सुरक्षा वाढवली, बिग बींनी ट्विटरवर दर्शवला पाठिंबा
SHARES

महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या सर्व चारही बंगल्यावरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. अभिनेत्री जया बच्चन यांच्या वक्तव्यानंतर हे पाऊल उचलण्यात आलं आहे. सर्व बंगल्यावर असणाऱ्या सिक्योरिटीमध्ये वाढ करण्यात आली आहे.

संसदेत समाजवादी पार्टीच्या राज्यसभा खासदार जया बच्चन (Jaya Bachchan) यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद सोशल मीडियावर उमटू लागले आहेत. सोशल मीडियावर युजर्सनी बच्चन परिवाराला ट्रोल केलं आहे. परिणामी ही सुरक्षा वाढवली असल्याची माहिती मिळत आहे. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा जुहू स्थित बंगल्याबाहेर देखील मुंबई पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

अमिताभ बच्चन हे जया बच्चन यांच्या समर्थनार्थ आले आहेत. अमिताभ यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये ट्रोलर्सना प्रत्युत्तर दिलं आहे. ट्विटरवर शेर शेअर करत त्यांनी म्हटलं आहे की, T 3661 - “झूठे हैं लोग जो सुबह को शाम, शाम को अंधेरे कहते हैं देखा है हमने चिराग़ों से जलने वाले चिराग़ों को घेरे रहते हैं “ जया बच्चन यांच्या समर्थनार्थ मैदानात अमिताभ बच्चन यांच्यासोबतच हेमा मिलानी (Hema Malini) देखील उतरल्या आहेत.

सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यूप्रकरणी सुरू असणाऱ्या तपासामध्ये ड्रग कनेक्शन समोर आल्यानंतर संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भाजपा खासदार आणि अभिनेता रवी किशन (Ravi Kishan) यांनी बॉलिवूडवर निशाणा साधला होता.

त्यावर उत्तर देताना मंगळवारी जया बच्चन यांनी रवी किशन यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली होती. त्याचे पडसाद सोशल मीडियावर उमटत आहेत.

जया बच्चन म्हणाल्या की, 'लोक बॉलिवूडला बदनाम करण्याच्या प्रयत्नात आहेत. काही दिवसांपासून बॉलिवूडला बदनाम केलं जात आहे. फक्त काही लोकांमुळे तुम्ही संपूर्ण इंडस्ट्रीवर कलंक ठेवू शकत नाही. मला खरोखर लाज वाटली की काल लोकसभेतील एक सदस्य, जे इंडस्ट्रीत आहेत, त्यांनी फिल्म इंडस्ट्रीविरूद्ध भाषण केलं.'

दरम्यान याप्रकणी अभिनेत्री कंगना रणौत हिने जया बच्चन यांना काही प्रश्न विचारत टीका केली आहे.

कंगना रणौतनं ट्वीट केलं आहे की, 'जया जी, जर मी तुमची मुलगी श्वेता असते आणि टीनएजमध्ये तिला मारले असते, ड्रग दिले असते आणि तिच्याबरोबर छेडछाड झाली असती, तरी देखील तुम्ही असंच म्हटलं असतं का? जर अभिषेकनं सातत्यानं गुंडगिरी आणि छळवणूक केल्याबद्दल तक्रार केली असती आणि एक दिवस गळफास घेतलेला आढळला असता तरी देखील तुम्ही असंच म्हटलं असतं का? आमच्याबद्दलही दया दाखवा'.हेही वाचा

संजय दत्त मुंबईतून अचानक परदेशी रवाना

राम गोपाल वर्मांनी केली स्वत:च्या बायोपिकची घोषणा, चित्रपट ठरणार वादग्रस्त?

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement