कविता पौडवाल यांचा 'चिंतामणी' सोलो अल्बम प्रकाशित

  • शुभांगी साळवे & मुंबई लाइव्ह टीम
  • मनोरंजन

गणांचा नायक असलेल्या गणेशाला पूजेमध्ये नेहमीच अग्रस्थान असते. सगळ्यांचंच आवडत दैवत म्हणून गणपती बाप्पाचं नेहमीच नाव घेतलं जातं. गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर गायिका कविता पौडवाल यांनी गणेश स्तुतीचा 'चिंतामणी' हा सोलो अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. नुकताच या अल्बमचा प्रकाशन सोहळा मुंबईत पार पडला. 

‘हे गणनायका शुभदायका वसशी मनी चिंतामणी’ असे या गीताचे बोल असून किशोर मोहिते यांनी ते लिहिलं असून त्यांचाच संगीतसाज या गाण्याला लाभला आहे. कोणत्याही कामाची सुरुवात आपण गणेशाचे वंदन करुनच करतो. गणपती बाप्पाचा उत्सव हा आनंद व आशेचं प्रतीक आहे. या दिवसात प्रत्येकामध्ये एक उत्साह पहायला मिळतो. हाच उत्साह या गीतामधून आपल्याला दिसणार आहे. हे संपूर्ण गाणं आता आपल्याला युट्युब वर ऐकता आणि पाहता येणार आहे.


हेही वाचा

'लपाछपी' सिनेमाचा ट्रेलर लाँच

पुढील बातमी
इतर बातम्या