अनुष्का-विराटच्या पेहरावाची बातच काही और...

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ही जोडी ११ डिसेंबरला लग्न बंधनात अडकली. त्यांच्या लग्नाविषयी कमालीची गुप्तता बाळगली होती. पण लग्नानंतर दोघांनीही अधिकृत घोषणा करत फोटो शेअर केले. साखरपुडा, हळद आणि लग्नाच्या विधीचे अनेक फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहे. सोशल मीडियावर त्यांच्या फोटो आणि व्हिडिओनं चांगलाच धुमाकूळ घातला. प्रत्येकाच्या ओठी फक्त विरुष्काच्या लग्नाची चर्चा आहे. लग्नासोबतच विराट आणि अनुष्का यांनी घातलेल्या पोषाखाची देखील जोरदार चर्चा सुरू आहे.

विरुष्काच्या ड्रेसमागे सब्यसाची

लग्नात अनुष्काचा आणि विराट या दोघांचा पोषाख सब्यसाची मुखर्जी यांनी तयार केला. अनुष्काचा लहेंगा तयार करायला त्यांच्या संपूर्ण टीमनं विशेष मेहनत घेतली आहे. लेहंगा तयार करण्यासाठी तब्बल ६७ कारागीर लागले. या सर्व कारागिरांनी मिळून ३२ दिवसांमध्ये हा शाही लेहंगा तयार करण्यात आला. फिकट गुलाबी रंगाचा हा लेहंगा अनुष्कावर फार उठून दिसत आहे.लेहंग्यावरील नक्षीकाम हातानं केलं आहे त्यामुळे तो आणखीन आकर्षक वाटत आहे

दागिन्यांची खासियत

अनुष्काच्या दागिन्यांवरही विशेष मेहनत घेतली आहे. या दागिन्यात पैलू न पाडलेले खडे आणि जपानी मोत्यांचा वापर करण्यात आला आहे. यासोबतच तिनं २२ कॅरेटचे सोन्याचे झुमके घातले आहेत. या झुमक्यातही पैलू न पाडलेले खडे आणि जपानी मोत्यांचा वापर करण्यात आला. अनुष्कानं घातलेल्या पंजाबी चपलांवर हातानं नक्षीकाम केले गेले होते

विराटचा पोषाख देखील लय भारी

विराटची शेरवानीही अनुष्काच्या लेहंग्याला शोभेल अशी होती.अनुष्काच्या लेहंग्याला मॅच होईल अशी शेरवानी विराटनं परीधान केली होती. विराटच्या शेरवानीसाठी पांढरा रंग निवडण्यात आला. शेरवानीवर बनारसी नक्षीकाम करण्यात आले आहे. शेरवानीवर हातनं कागागिरी देखील करण्यात आली आहे. टसर फॅब्रिकच्या स्टोलसह त्यानं विराटनं फिकट गुलाबी रंगाचा फेटा बांधला होता.   

साखरपुड्याला अनुष्कानं मरून रंगाची साडी नेसली होती. साडीवरील मोतीसह मरोरीची कारागिरी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. तर विराटनं व्हाइट शर्टवर निळ्या रंगाचा सूट घातला होता. 

अनुष्कानं ग्राफिक क्रॉप टॉपसह गुलाबी आणि केशरी रंगाचा सिल्कचा लेहंगा घातला होता. या लेहंग्यावरही कोलकाताची प्रसिद्ध ब्लॉक प्रिंट करण्यात आली होती. मेहंदी समारंभात विराटनं खादीचा सफेद कुर्ता आणि त्याच रंगाचा चुडिदार गातला होता. अनुष्काच्या ड्रेसला मॅचिंग म्हणून त्यानं गुलाबी रंगाचे नेहरु जॅकेट वापरले होते. 


हेही वाचा

कोहली नव दाम्पत्याचं असंही दान

पुढील बातमी
इतर बातम्या