Advertisement

कोहली नव दाम्पत्याचं असंही दान


कोहली नव दाम्पत्याचं असंही दान
SHARES

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा म्हणजेच विरुष्का सोमवारी, ११ डिसेंबर रोजी विवाहबद्ध झाले. इटलीतल्या मिलान इथं यांचा विवाह संपन्न झाला. यावेळी शर्मा आणि कोहली यांचे नातेवाईक आणि जवळचे मित्र उपस्थित होते.

यावेळी अनुष्काने गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान केला होता. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. तर तिकडे विराटने त्याला साजेल असे कपडे घातले होते. या दोघांच्या लग्नाचे कपडे डिझायनर सब्यसाची मुखर्जीने तयार केले होते.


लग्नाचे फोटो, व्हिडिओ विकणार

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी आपल्या लग्नातील प्रत्येक क्षणाचे फोटो आणि लग्नापूर्वी पार पडलेल्या मेहंदी, संगीताच्या कार्यक्रमाचे व्हिडिओ एका मीडिया प्रकाशन कंपनीला विकण्याचा निर्णय घेतला आहे. यामधून मिळालेले पैसे चॅरिटीला दान स्वरुप देणार आहेत.

या दोघांच्या लग्नाचे रिसेप्शन २१ डिसेंबरला दिल्लीत आयोजित करण्यात आले आहे. त्यानंतर २६ डिसेंबरला मुंबईत बॉलिवूड आणि क्रिकेटमधील मित्रांसाठी रिसेप्शन पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा