कल्याण डोंबिवलीत ३०७ नवीन कोरोना रुग्ण

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात सोमवारी कोरोनाचे नवीन ३०७ रुग्ण आढळले. तर ४ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ३९८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ४१,७७३ झाली आहे. यामध्ये ४१८० रुग्ण उपचार घेत असून ३६,७७७ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ८१६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नवीन रूग्णांमध्ये कल्याण पूर्व ४७, कल्याण पश्चिम १०४, डोंबिवली पूर्व ८२, डोंबिवली पश्चिम  ४९, मांडा टिटवाळा १५, मोहना ६, तर पिसवली येथील ४ रुग्णांचा समावेश आहे.

डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ९० रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, १३ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय, ६ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून, ४ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड सेंटर येथून, २ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून, २ रुग्ण आसरा फाउंडेशन स्कूल मधून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशनमधून बरे झालेले आहेत.


हेही वाचा -

मुंबईतील कोरोनामुक्तांचं प्रमाण ८२ टक्क्यांवर

लाॅकडाऊनचे उल्लघंन केल्याप्रकरणी राज्यात २ लाख गुन्हे दाखल


पुढील बातमी
इतर बातम्या