Advertisement

मुंबईतील कोरोनामुक्तांचं प्रमाण ८२ टक्क्यांवर

महापालिकेनं चाचण्यांचं प्रमाण वाढविलं आहे. त्याशिवाय कोरोना बाधितांच्या संपर्कातील संशयित रुग्णांचा शोधही युद्धपातळीवर सुरू केला आहे.

मुंबईतील कोरोनामुक्तांचं प्रमाण ८२ टक्क्यांवर
SHARES

मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेनं कोरोनाबाधितांचा शोध घेण्यास सुरुवात केली. यासाठी महापालिकेनं चाचण्यांचं प्रमाण वाढविलं आहे. त्याशिवाय कोरोना बाधितांच्या संपर्कातील संशयित रुग्णांचा शोधही युद्धपातळीवर सुरू केला आहे. त्यामुळं मुंबईतील कोरोनामुक्तांचे प्रमाण ८२ टक्क्यांवर पोहोचले असून, रुग्ण दुपटीचा काळही सरासरी ६६ दिवस झाला आहे.

महापालिकेच्या माहितीनुसार, रविवारी २,२६१ मुंबईकरांना कोरोनाची लागण झाली, तर ४४ जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात तब्बल ४ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ९८ हजार ७२० वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत ८,७९१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रविवारी मृत्यू झालेल्या ४४ जणांमध्ये ३० पुरुष आणि १४ महिलांचा समावेश होता. यापैकी ३८ जणांना दीर्घकालीन आजार होते.

विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेणारे तब्बल ४,१९० रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले. आतापर्यंत एक लाख ६२ हजार ९३९ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. झोपडपट्ट्यांच्या तुलनेत इमारतींमध्ये मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत.

कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यामुळे आतापर्यंत १० हजार २८९ इमारती टाळेबंद करण्यात आल्या आहेत. तर ६७६ ठिकाणे प्रतिबंधित करण्यात आली आहेत. करोनाबाधितांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत १० लाख ८२ हजार ३२९ चाचण्या करण्यात आल्या आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा