Cyclone Tauktae 2021: महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता; कोकण किनारपट्टीवर हायअलर्ट जारी

अरबी समुद्रातील दक्षिण-पूर्व भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पुढील २४ तासांत त्याचं चक्रीवादळात रूपांतर होणार आहे. या वादळाचं नाव तौंते असं ठेवण्यात आलं आहे. या वादळाचा प्रभाव १५ ते १७ मे असा ३ दिवस दिसणार आहे.

परिणामी कोकण किनारपट्टी, रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि गोव्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर १६ आणि १७ मे रोजी मुंबई, पालघर, ठाणे, रायगड या जिल्ह्यांमध्ये या वादळाचा प्रभाव दिसेल अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.

समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मच्छिमारांना किनाऱ्यावर येऊन आपल्या बोटी सुरक्षित ठिकाणी ठेवण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या आहेत.

  • म्यानमारने चक्रीवादळाला तौंते असं नाव दिलं आहे
  • केरळ, गुजरात, महाराष्ट्राच्या किनारपट्टीला सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे
  • गुजरात किनारपट्टीला वादळाकडून नुकसान पोहचण्याची शक्यता आहे
  • हवामान विभागाकडून आॅरेंज अलर्ट जारी
  • चक्रीवादळात वेगाने वाढ होण्याची शक्यता
  • या कालावधीत ताशी ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता
  • वादळाच्या तडाख्यातून सावरण्यासाठी मदत म्हणून एनडीआरच्या ५३ तुकड्या तैनात
  • दक्षिण कोकण आणि गोवा भागात १५ मे रोजी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता मात्र त्याची तीव्रता वाढून १६ आणि १७ मे राेजी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता 
  • रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात हायअलर्ट जारी 
  • मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरात १७ मे रोजी मुसळधार पावसाची शक्यता
  • महाराष्ट्रातील घाट परिसरातील कोल्हापूर, सातारा इथंही १६, १७ मे रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज
  • पुण्यातही १७ मे रोजी मुसळधार पावसाचा इशारा
  • समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या सर्व मच्छीमारांना त्वरित बंदरात आणण्याचं काम तटरक्षक दल, कस्टम्स आणि पोलीस दलाकडे सोपवण्यात आलं आहे
  • तटरक्षक दलाकडून समुद्रात जाऊन सुचना देण्यास सुरूवात झाली आहे

हेही वाचा- सावधान! राज्यासाठी पुढचे २४ तास महत्त्वाचे, हवामान खात्याचा इशारा

पुढील बातमी
इतर बातम्या