Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,08,992
Recovered:
56,39,271
Deaths:
1,11,104
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,773
700
Maharashtra
1,55,588
10,442

सावधान! राज्यासाठी पुढचे २४ तास महत्त्वाचे, हवामान खात्याचा इशारा

राज्यासाठी पुढचे काही दिवस महत्त्वाचे असणार असून, हवामान खात्याकडून मे महिन्यात पाऊस कोसळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

सावधान! राज्यासाठी पुढचे २४ तास महत्त्वाचे, हवामान खात्याचा इशारा
SHARES

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना येत्या काही दिवसांत दिलासा मिळण्याची शक्यता आहे. असं असलं तरी नागरिकांना सतर्क राहण्याच इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. कारण राज्यासाठी पुढचे काही दिवस महत्त्वाचे असणार असून, हवामान खात्याकडून मे महिन्यात पाऊस कोसळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे पुढच्या २४ तासात त्यांचं रुपांतर चक्रीवादळात होणार आहे. यामुळे कोकणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, मुंबई किंवा कोकण किनारपट्टीवर या चक्रीवादळाचा कोणताही धोका नसला तरी राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळणार असल्याची माहिती समोर येत आहे.

राज्यात आज २४ तासांत अनेक जिल्हे आणि शहरांमध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळतील. कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि मुंबई, पुण्यातही पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. हा कमी दाबाचा पट्टा लक्षद्वीपजवळ पूर्व-मध्य अरबी समुद्रात १५ मे रोजी अधिक तीव्र होईल आणि उत्तर आणि वायव्य दिशेकडे प्रवास करेल. त्यानंतर या प्रणालीचे १६ मे रोजी चक्रीवादळात रूपातंर होईल. त्यानंतर चक्रीवादळाचा उत्तर आणि वायव्य दिशेने प्रवास सुरू राहील.

या काळात महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनारपट्टीवर जोरदार वाऱ्यांसह मेघगर्जना आणि पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्राचा काही भाग, मराठवाडा येथे १४ मे ते १६ मे या काळासाठी इशारा दिला आहे.

मुंबई, पालघर, ठाणे येथे रविवारी हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रायगड येथे शुक्रवारपासून हलका पाऊस आणि मेघगर्जना होऊ शकते. तर रविवारी पावसाची तीव्रता आणि वाऱ्यांचा जोर वाढू शकतो. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात रविवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. शुक्रवारपासून किनारपट्टीवर जोरदार वारे, मेघगर्जनांचा अनुभव येण्याची शक्यता आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा