पारा घसरला! ५ वर्षांनंतर नोव्हेंबरमधील सर्वात कमी तापमानाची नोंद

राज्यात थंडीची लाट आली असून अनेक भागातील किमान तापमान हे आठ अंश सेल्सिअसवर घसरले आहे. मुंबई किमान तापमान १७ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. 2017नंतर नोव्हेंबरमधील सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

मुंबई उपनगरांत रविवारी रात्रीपासून पारा घसरू लागला आहे. मुंबईत सोमवारी सकाळी सांताक्रूझ केंद्राने किमान तापमान १७ अंश सेल्सिअस आणि कुलाबा केंद्राने किमान २०.९ अंश सेल्सिअस नोंदवले.

येत्या दोन दिवसात दोन ते तीन अंश सेल्सिअसने तापमानात घसरण होण्याची शक्यता आहे.नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला कमाल आणि किमान तापमानामध्ये खूप फरक असल्याने संमिश्र तापमानाला सामोरे जावे लागत होते.

उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंड लाटेमुळे तापमानात घसरण झाली आहे, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

“शीत लाटेच्या चेतावणी व्यतिरिक्त, तापमानात झालेली घट ही उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा परिणाम आहे. तथापि, बंगालच्या उपसागराच्या पूर्वेकडील भागात आर्द्रतेचे प्रमाण वाढेल आणि त्यामुळे तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे,” असे जयंता सरकार, उपमहासंचालक, प्रादेशिक हवामान केंद्र, पश्चिम क्षेत्र, IMD यांनी सांगितले.

हवामान खात्याने 2021 साठी किमान तापमान जाहीर केले नाही. तथापि, मागील वर्षांमध्ये किमान तापमान 17 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले नाही. मुंबईत 2020 मध्ये 19.4 अंश, 2019 मध्ये 20.5 अंश, 2018 मध्ये 19.3 अंश आणि 2017 मध्ये 18 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.


हेही वाचा

मुंबईत गारठा वाढला! पुढील दहा दिवस थंडीचे, IMD चा इशारा

पुढील बातमी
इतर बातम्या