मुंबईतील नद्या सर्वाधिक प्रदूषित

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) नवीन मूल्यांकनानुसार, मुंबईतील (mumbai) नद्या देशातील सर्वाधिक प्रदूषित नद्यांमध्ये समाविष्ट आहेत. अहवालात असेही दिसून आले आहे की भारतातील सर्वाधिक प्रदूषित 54 नद्या महाराष्ट्रात आहेत.

अहवालात अधोरेखित केले आहे की पवई आणि विहार तलावांमधून माहीम खाडीत वाहणारी मिठी नदी ही सर्वात प्रदूषित नद्यांपैकी एक आहे.

वारंवार स्वच्छता मोहिमा राबवूनही नदीचे (rivers) पाणी अस्वच्छ आणि निकृष्ट दर्जाचे आहे. दहिसर (dahisar), पोईसर (poisar), ओशिवरा (Oshiwara) आणि उल्हास (Ulhas) नद्या देखील मोठ्या प्रमाणात प्रभावित होत आहेत.

सीपीसीबीच्या (CPCB) मते प्रदूषित नद्यांमध्ये बायोकेमिकल ऑक्सिजन किंवा बीओडी प्रति लिटर 3 मिलीग्रामपेक्षा जास्त आहे. उच्च बीओडी पातळी प्रदूषणाची (polluted) जास्त मात्रा दर्शवते आणि जलचरांना धोका निर्माण करते.

एकाच नदीवरील दोन किंवा अधिक सलग प्रदूषित क्षेत्रांना एक प्रदूषित भाग म्हणून मानले जाते.

कचरा, प्रक्रिया न केलेले सांडपाणी आणि औद्योगिक कचरा टाकल्यामुळे नद्यांमध्ये प्रदूषण होते. देशात प्रदूषित नद्यांच्या संख्येत थोडीशी घट झाली आहे. देशातील प्रदुषित नद्यांचा आकडा 311 वरून 296 वर आला आहे.

2022 आणि 2023 दरम्यान देशभरातील 2,116 नद्यांचा आढावा घेण्यात आला. 32 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेल्या 271 नद्यांवर एकूण 296 प्रदूषित पट्टे नोंदवण्यात आले.

2022 मध्ये प्रसिद्ध झालेला मागील अहवाल 2019 आणि 2021 मधील डेटावर आधारित होता. 2020 हे वर्ष कोविडमुळे वगळण्यात आले होते.

राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने 2018 मध्ये सीपीसीबीच्या नदी प्रदूषणाच्या निष्कर्षांची दखल घेतली होती. त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारांना नदी पुनरुज्जीवनासाठी कृती योजना तयार करण्याचे निर्देश दिले. परिणामी, प्रदूषण कमी करण्यासाठी धोरणे आखण्यासाठी समित्या स्थापन करण्यात आल्या.

सध्या, सीपीसीबी राष्ट्रीय जल गुणवत्ता देखरेख कार्यक्रमांतर्गत भारतातील 645 नद्यांवर 2,155 ठिकाणी पाण्याच्या गुणवत्तेचे निरीक्षण करत आहे.

आता, सीपीसीबीने सरकारला पूरग्रस्त क्षेत्रांचे संरक्षण, सांडपाण्यावर प्रक्रिया आणि नदी खोरे आणि पाणलोट क्षेत्रांचे व्यवस्थापन यावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे.


हेही वाचा

अंधेरी: खड्ड्यामुळे अपघात होऊन तरुण जखमी

ठाणे मेट्रो मुंबईला जोडणार

पुढील बातमी
इतर बातम्या