मच्छिमारांनो सावधान! 'सागर' चक्रीवादळ येतंय...

काही महिन्यांपूर्वी अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टी निर्माण झाल्यामुळे मुंबईसह महाराष्ट्राला 'अोखी' वादळाचा तडाखा बसला होता. अाता देशातील पश्चिमोत्तर राज्यांत ‘सागर’ नावाचं चक्रीवादळ धडकणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हवामान खात्यानं तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्रासह मुंबई आणि लक्षद्वीप या राज्यांना ‘सागर’ चक्रीवादळ संबंधात हाय अलर्ट जारी केलं आहे.

मच्छिमारांवर निर्बंध

१ जूनपासून राज्यात दोन महिने मासेमारीसाठी बंदी असते. प्रजननासाठी ही बंदी घातली जाते. या बंदीला काही दिवस उरलेले असतानाच अाता मच्छिमारांना 'सागर' चक्रीवादळाचा फटका बसणार अाहे. मत्स्यविभागानं मच्छिमारांवर खोल समुद्रात मासेमारी करण्यास बंदी घातली अाहे. त्यामुळं मच्छिमारांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार अाहे.

काय अाहे ‘सागर’ चक्रीवादळ?

‘सागर’ चक्रीवादळ सध्या यमनच्या अदन शहरापासून ३९० किलोमीटरच्या दक्षिण-पूर्वेकडे आणि सोकोत्रा द्वीपसमूहांपासून ५६० किलोमीटर अंतरावर पश्चिम-उत्तर-पश्चिममधील अदनच्या खाडीवर स्थित आहे. येत्या १२ तासांत या वादळाची तीव्रता कमी होऊन ते पुढे सरकणार आहे.

पश्चिमेत्तर राज्यांना सतर्कतेचा इशारा

म्हणून पश्चिमेत्तर राज्यांतील सागरी किनाऱ्यांवरील समुद्र खवळलेला असेल. त्यामुळे येत्या ४८ तासांत मासेमारांनी सुमद्रात मासेमारीसाठी जाऊ नये. लहान बोटींनी सुद्धा समुद्रात जाऊ नये, असा सतर्कतेचा इशारा हवामान तज्ज्ञांनी दिला आहे.


हेही वाचा -

मुंबईत वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज

कसोटीतून 'टाॅस' होणार हद्दपार?

पुढील बातमी
इतर बातम्या