Advertisement

मुंबईत वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज


मुंबईत वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज
SHARES

मुंबईमध्ये या आठवड्याच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कुलाबा वेधशाळेने हा अंदाज वर्तवला आहे. मार्च महिन्यातलं सर्वाधिक तापमान ३८.१ डिग्री नोंदवण्यात आलं आहे. मार्च महिन्यातलं आत्तापर्यंतचं सर्वाधिक तापमान २८ मार्च १९५६ रोजी नोंदवण्यात आलं होतं.


कुलाबा वेधशाळेचा अंदाज

कुलाबा वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार या आठवड्याच्या शेवटी मुंबईतील तापमान अजून वाढण्याची शक्यता आहे. तसेच, गेल्या काही दिवसांपासून तापमान सलग सामान्य तापमानापेक्षा अधिक नोंदवण्यात आलं आहे.


कुलाब्यात आर्द्रता ७१ टक्के

सोमवारी कुलाबामध्ये कमाल तापमान ३३.२ डिग्री सेल्सिअस नोंदवण्यात आलं. तर सांताक्रूजमध्ये ३६.४ डिग्री तापमान नोंदवण्यात आलं. हे तापमान सामान्य तापमानाच्या ३.५ डिग्री सेल्सिअसने जास्त होतं. तसेच, सोमवारी कुलाब्यामध्ये आर्दता ७१ टक्के इतकी तर सांताक्रूजमध्ये ३२ टक्के नोंदवण्यात आली आहे.


कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाची शक्यता

उष्ण वातावरणामुळे देशात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे. हा कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्राच्या दिशेने सरकत असल्यामुळे मुंबईत वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता असल्याचं कुलाबा वेधशाळेचे वैज्ञानिक अजय कुमार यांनी सांगितलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा