मध्य रेल्वेच्या 'प्लास्टिक द्या, मास्क घ्या' मोहिमेला सुरूवात

मध्य रेल्वेनं जागतिक पुनर्वापर दिनानिमित्त गुरूवारी नव्या मोहिमेला सुरूवात केली. प्लास्टिकचे संग्रहण व पुनर्वापर करण्याबाबत जनजागृती व्हावी यासाठी 'प्लास्टिक द्या, मास्क घ्या' या मोहिमेला सुरूवात करण्यात आली. ही मोहीम केंद्र सरकार, संयुक्त राष्ट्र, मुंबई महानगरपालिका, स्त्री मुक्ती संघटना (एसएमएस) आणि हिंदुस्तान युनिलिव्हर यांच्या संयुक्त विद्यमानं राबविण्यात येत आहे.

बंदीयोग्य प्लास्टिकच्या वापरामुळं प्रदूषणाच्या समस्येत वाढ होत आहे. ही बाब लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व दादर रेल्वे स्थानकांवर प्लास्टिक कचरा संकलन केंद्र सुरू केलं आहे. या केंद्रांमध्ये सर्व प्रकारचं प्लास्टिक म्हणजेच बाटल्या, पॉलिथीन पिशव्या आदी जमा करता येतात.

केंद्रात प्लास्टिकचा कचरा जमा केल्यानंतर मास्क दिला जातो. यामुळं मास्कचं वाटप करून कोरोनाचा प्रसार रोखता येऊ शकणार आहे. प्लास्टिक कचरा गोळा करणं आणि त्याचा पुनर्वापर करणं याबाबत मोहिमेद्वारे जनजागृती करण्यात येत आहे.


हेही वाचा -

धारावीत स्वतंत्र लसीकरण केंद्र

१३४ खासगी रुग्णालयांना लसीकरणासाठी मान्यता


पुढील बातमी
इतर बातम्या