मुंबई (mumbai) आणि उपनगरात मुसळधार पाऊस सुरू आहे. 20 जुलैपासून मुंबई आणि आसपासच्या भागात मुसळधार पाऊस (mumbai rains) पडत आहे. मुंबईच्या पश्चिम आणि मध्य उपनगरात मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे (weather) अनेक सखल भागात पाणी साचले आहे.
मुंबईच्या पूर्व उपनगरातील घाटकोपर, भांडुप, मुलुंड, चेंबूर, गोवंडी (gowandi) भागात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी भरू लागले आहे. साकीनाका मेट्रो परिसरातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. वाहनचालकांना पाण्यातून मार्ग काढणे कठीण होत आहे. दरम्यान, पश्चिम रेल्वेची (western railway) जलद लोकल 10 ते 12 मिनिटे उशिराने धावत आहे.
आज सकाळपासून मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम द्रुतगती मार्गावर मोठी कोंडी झाली आहे. आज सकाळपासून पश्चिम उपनगरात मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे पाण्यात बुडाला आहे. अंधेरी सबवेमध्ये दोन ते तीन फूट पाणी साचल्याने वाहतुकीसाठी सबवे बंद करण्यात आला आहे.
पावसामुळे वेस्टर्न एक्सप्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. बोरिवली ते वांद्रे या मार्गावर सांताक्रूझ, विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड दरम्यान मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.
मुसळधार पावसामुळे वेस्टर्न एक्सप्रेस वेच्या सखल भागात अनेक ठिकाणी पाणी भरले आहे. त्यामुळे वेस्टर्न एक्सप्रेस वेवर वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत.
हेही वाचा