महामुंबई परिसरात राहणाऱ्या कोकणवासीयांची गौरीगणपतीसाठी (ganpati festival) विशेष रेल्वे गाड्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. मध्य रेल्वेने (central railway) 250 गणपती विशेष रेल्वे फेऱ्यांची घोषणा केली आहे. सर्व विशेष गाड्यांचे (special trains) आरक्षण 24 जुलैपासून सुरू होणार आहे.
गाड्यांची सविस्तर माहिती मध्य रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे किंवा एनटीईएस मोबाइल ॲप वर उपलब्ध आहे.
क्र. 01151/2 सीएसएमटी- सावंतवाडी रोड-सीएसएमटी (रोज) (40 फेऱ्या)
22 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर
सीएसएमटीहून (csmt) मध्यरात्रीनंतर 12.20 ला सुटेल. सावंतवाडीला दुपारी 2.20 ला पोहोचेल.
क्र. 01103/4 सीएसएमटी- सावंतवाडी रोड-सीएसएमटी (रोज)(३६ फेऱ्या)
22 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर
सीएसएमटीहून दु. 3.30 ला सुटेल, सावंतवाडीला दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वा. पोहोचेल.
क्र. 01153/4 सीएसएमटी- रत्नागिरी -सीएसएमटी (रोज) (36 फेऱ्या)
22 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर
सीएसएमटीहून स. 11.30 ला सुटेल, रत्नागिरीला रात्री 8.10 ला पोहोचेल.
क्र. 01167/8 एलटीटी- सावंतवाडी-एलटीटी (रोज)(36 फेऱ्या)
22 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर
एलटीटीहून रात्री 9 वा. सुटेल, सावंतवाडीत दुसऱ्या दिवशी स. 9.20 ला पोहोचेल.
क्र. 01171/2 एलटीटी- सावंतवाडी रोड- एलटीटी (रोज)(36 फेऱ्या)
22 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर
एलटीटीहून स. 8.20 ला सुटेल, सावंतवाडीत रात्री 9 वा. पोहोचेल.
क्र. 01129/30 एलटीटी- सावंतवाडी रोड-एलटीटी (दर मंगळवारी)(सहा फेऱ्या)
26 ऑगस्ट, 2 सप्टेंबर, 9 सप्टेंबर
एलटीटीहून स. 8.45 ला सुटेल. सावंतवाडीला रात्री 10.20 ला पोहोचेल.
क्र. 01185/6 एलटीटी- मडगाव-एलटीटी (दर बुधवारी)(चार फेऱ्या)
27 ऑगस्ट, 3 सप्टेंबर
एलटीटीहून मध्यरात्रीनंतर 12.20 ला सुटेल. मडगावला दु. 2.30 ला पोहोचेल.
क्र. 01165/6 एलटीटी- मडगाव-एलटीटी वातानुकूलित (मंगळवारी) (वातानुकूलित-सहा फेऱ्या)
26 ऑगस्ट, 2 सप्टेंबर, 9 सप्टेंबर
एलटीटीहून मध्यरात्रीनंतर 12.45 ला सुटेल.
पश्चिम रेल्वेवरही 44 फेऱ्या
चर्चगेटपासून विरारपर्यंतच्या परिसरातील कोकणवासींसाठी पश्चिम रेल्वेने 44 गणपती विशेष रेल्वेफेऱ्या चालवण्याची घोषणा केली आहे. येत्या आठवड्यात गाड्यांचे आरक्षण सुरू होणार आहे.
क्र. 09011/12 मुंबई सेंट्रल-ठोकूर-मुंबई सेंट्रल (साप्ताहिक)(चार फेऱ्या)
26 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर
मुंबई सेंट्रलहून मंगळवारी स. 11.30 वाजता सुटेल; बुधवारी स. 8.50 वाजता ठोकूरला पोहोचेल.
थांबे : बोरिवली, वसई रोड, कामण रोड, भिवंडी रोड, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि, करमाळी, मडगाव इत्यादी
क्र. 09019/20 मुंबई सेंट्रल-सावंतवाडी रोड-मुंबई सेंट्रल (आठवड्यातील चार दिवस) (20 फेऱ्या)
मुंबई सेंट्रलहून बुधवार, शुक्रवार, शनिवार, रविवारी स. 11.30 वा. सुटेल; दुसऱ्या दिवशी मध्यरात्री 2.30 वा. पोहोचेल
22 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर
क्र. 09015/16 वांद्रे टर्मिनस-रत्नागिरी-वांद्रे टर्मिनस (साप्ताहिक) (सहा फेऱ्या),
वांद्रेहून दर गुरुवारी दु. 2.20 वा. सुटेल; रत्नागिरीला त्याच दिवशी मध्यरात्रीनंतर 12.20 वा. पोहोचेल 21ऑगस्ट ते 4 सप्टेंबर
हेही वाचा