मुंबईत रविवारपर्यंत पावसाची शक्यता, IMDचा अंदाज

(File Image)
(File Image)

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) 5 दिवस पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई, ठाणे आणि पालघरच्या काही भागात 7 ते 10 जून दरम्यान हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा दिला आहे.

IMD ने मंगळवार, 6 जून रोजी रात्री उशिरा जाहीर केलेल्या एका अलर्टमध्ये म्हटले आहे की, “भारतीय वेळेनुसार 1730 तासांनी पूर्व-मध्य अरबी समुद्रावरील बिपरजॉय चक्रीवादळात खोल उदासीनता तीव्र झाली आहे. जवळपास उत्तरेकडे सरकणे आणि पुढील 24 तासांत तीव्र चक्री वादळात रूपांतर करणे.”

चक्रिवादळाच्या एकंदर वातावरणामध्ये कर्नाटकचा किनारपट्टी भाग, लक्षद्वीप, मालदीवसह कोकण आणि गोव्याच्या किनारपट्टी भागांमध्ये समुद्र 10 जूनपर्यंत उसळलेला असेल. याचा परिणाम मान्सूनवर होणार असून राज्यात आणि केरळातही मान्सून लांबणीवर पडला आहे.

दरम्यान वादळाच्या काळात होणारा पाऊस हा मान्सून नाही ही बाब लक्षात घ्यावी असंही हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. 

मुंबई किनारपट्टीवर जोरदार वारे आणि उंच लाटा येण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे. 8 ते 10 जून दरम्यान मुंबई आणि पुण्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

शिवाय, शनिवार, 10 जून आणि रविवार, 11 जून या आठवड्याच्या शेवटी मुंबई आणि कोकण भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मुंबईत मान्सून दाखल होण्याची तारीख 11 जून आहे. परंतु केरळमध्ये अद्याप सुरुवात न झाल्याने शहराची प्रतीक्षा आणखी लांबू शकते. मात्र, या पावसामुळे राज्यभरात उसळलेल्या उष्णतेच्या लाटेपासून दिलासा मिळणार आहे.


हेही वाचा

यंदा पावसाळ्यात 52 दिवस भरती

पुढील बातमी
इतर बातम्या