Advertisement

यंदा पावसाळ्यात 52 दिवस भरती

3 ऑगस्ट रोजी दुपारी 3:00 वाजता सर्वोच्च लाट धडकेल आणि या लाटांची उंची 4.60 मीटर असेल.

यंदा पावसाळ्यात 52 दिवस भरती
SHARES

यंदा पावसाळ्यात ५२ दिवस भरती असणार आहे. या काळात अतिवृष्टी झाल्यास सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने महापालिका यंत्रणा सतर्क राहणार आहे. नागरिकांनीही या हायटाईड्सची नोंद घ्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

आपत्कालीन व्यवस्थापन योजनेचा भाग म्हणून पावसाळ्यात चार मीटरपेक्षा जास्त उंच भरतीचे दिवस जाहीर केले जातात. या वर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत सुमारे 52 दिवस भरती आहे, असे उपायुक्त (आपत्ती व्यवस्थापन विभाग) जी.जी. गोदेपुरे यांनी सांगितले.

जून महिन्यात 13 दिवस, जुलै महिन्यात 14 दिवस, ऑगस्ट महिन्यात 14 दिवस आणि सप्टेंबर महिन्यात 11 दिवस भरती असेल. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने हे हाय टाईड वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. 3 ऑगस्ट रोजी दुपारी 3:00 वाजता सर्वोच्च लाट धडकेल आणि या लाटांची उंची 4.60 मीटर असेल.

या पावसाळ्यात भरती-ओहोटीच्या अनुषंगाने ठाणे महापालिकेने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महापालिकेच्या आपत्कालीन विभागाने केले आहे.



हेही वाचा

अखेर दिलासा! पावसाळ्यात मिलन सबवेत पाणी भरणार नाही

अधिकचं पाणी मिळावं यासाठी पालिकेकडून राज्य सरकारला पत्र

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा