Advertisement

अधिकचं पाणी मिळावं यासाठी पालिकेकडून राज्य सरकारला पत्र

मुंबईत पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये फक्त 19.5 टक्के पाणी शिल्लक आहे.

अधिकचं पाणी मिळावं यासाठी पालिकेकडून राज्य सरकारला पत्र
SHARES

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 19.5 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे मुंबई समोर पाणी कपातीचे संकट उभं राहण्याची शक्यता आहे.  

मुंबई महापालिकेने राज्य सरकारला अप्पर वैतरणा आणि भातसा धरणातून अधिकचे पाणी मिळावे यासाठी पत्र लिहिले आहे. (Mumbai Water Shortage News)

मुंबईला सात धराणांमधून पाणी पुरवठा केला जातो. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सात धरणांमध्ये केवळ 19.5 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे.  

याच महिन्यात 2022 मध्ये मे महिन्यात याच काळात 23 टक्के पाणीसाठा होता.  यासाठीच मुंबई महापालिकेने राज्य सरकारला अतिरिक्त पाणीसाठा मिळावा यासाठी पत्र लिहून मागणी केली असल्याची माहिती समोर आहे.

अप्पर वैतरणा आणि भातसा धरणातील शिल्लक पाणी हे मुंबईसाठी  द्यावे अशा प्रकारची मागणी राज्य सरकारकडे मुंबई महापालिकेने केली आहे. 

  • अप्पर वैतरणा -12 टक्के
  • मोडक सागर - 29 टक्के
  • तानसा - 31 टक्के
  • मध्य वैतरणा - 13 टक्के
  • भातसा -18 टक्के
  • विहार - 35 टक्के
  • तुळसी- 36 टक्के



हेही वाचा

दोन दिवस मुंबई आणि परिसरात हलका पाऊस पडण्याची शक्यता

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा