मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर वाढला

मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर वाढला आहे. शनिवारी सुरू झालेल्या पावसानं रविवारी मुंबईत विश्रांती घेतली होती. मात्र सोमवारपासून पुन्हा पावसानं जोरदार हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे. तसंच, ठाणे, कल्याण, बदलापूर भागातही मुसळधार पाऊस कोसळत आहे. या मुसळधार पावसामुळं हवामान विभागानं मुंबईत पावासाचा जोर कायम राहणार असल्याची शक्यता वर्तवली आहे.  

मुसळधार पावसाचा अंदाज

हवामान विभागानं मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील काही भागांत मंगळवारी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मंगळवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार २४ तासांत कुलाबा वेधशाळेनं २०.४ मि.मी. इतक्या पावसाची नोंद केली आहे. तसंच, सांताक्रूझ वेधशाळेत ३८.९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

हवामान विभागाचं आवाहन

महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात येत्या २४ तासांत ताशी ४० ते ५० किमी वेगानं वारे वाहणार आहेत. त्यामुळं मुंबईकरांनी समुद्र किनाऱ्यांपासून दूर राहण्याच इशारा हवामान विभागानं दिला आहे. त्याशिवाय मच्छिमारांना देखील समुद्रात न जाण्याचं आवाहन हवामान विभागानं केलं आहे.


हेही वाचा -

गणेश नाईकांनी पक्ष खड्ड्यात घातला, जितेंद्र आव्हाडांनी डागली तोफ

हर्षवर्धनचा रिव्हेंज ड्रामा सुरू


पुढील बातमी
इतर बातम्या