Advertisement

हर्षवर्धनचा रिव्हेंज ड्रामा सुरू

तीन वर्षांपूर्वी 'सनम तेरी कसम' असं म्हणत हिंदीत दाखल झालेला अभिनेता हर्षवर्धन राणे मागील काही दिवसांपासून 'तैश' या आगामी हिंदी चित्रपटामुळं पुन्हा लाइमलाईटमध्ये आला आहे. रिव्हेंज ड्रामा असलेल्या या चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं आहे.

हर्षवर्धनचा रिव्हेंज ड्रामा सुरू
SHARES

तीन वर्षांपूर्वी 'सनम तेरी कसम' असं म्हणत हिंदीत दाखल झालेला अभिनेता हर्षवर्धन राणे मागील काही दिवसांपासून 'तैश' या आगामी हिंदी चित्रपटामुळं पुन्हा लाइमलाईटमध्ये आला आहे. रिव्हेंज ड्रामा असलेल्या या चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं आहे.

शूटिंगला सुरुवात

'वझीर', 'पिझ्झा', 'कारवां' असे वेगळ्या प्रवाहातील चित्रपट बनवणारे दिग्दर्शक बिजॅाय नाम्बियार मागील काही दिवसांपासून 'तैश' या आपल्या आगामी हिंदी चित्रपटाच्या प्री प्रोडक्शनच्या कामात गुंतले होते. या चित्रपटाची प्राथमिक पातळीवरील तयारी पूर्ण झाल्यानंतर आता शूटिंगला सुरुवात झाली आहे. या चित्रपटाच्या क्लॅपचा फोटोही सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाला आहे. 'सनम तेरी कसम' या चित्रपटाद्वारे सर्वांचं लक्ष वेधून घेणारा हर्षवर्धन राणे या चित्रपटात एका मुख्य भूमिकेत झळकणार आहे. त्याच्या जोडीला पुलकीत सम्राट, जिम सर्भ, क्रिती खरबंदा आणि संजीदा शेख हे कलाकार आहेत.

दक्षिणात्य चित्रपट नावावर

हर्षवर्धनबाबत बोलायचं तर २०१० मध्ये दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून आपली अभिनय कारकिर्द सुरू करत त्यानं तेलुगू, तमिळसह हिंदी चित्रपटांमध्येही अभिनय केला आहे. आजवर डझनभर दक्षिणात्य चित्रपट नावावर असलेल्या हर्षवर्धननं 'सनम तेरी कसम' या चित्रपटाद्वारे हिंदीत एंट्री केली. दमदार अभिनयाच्या बळावर त्यानं गत वर्षी प्रदर्शित झालेल्या जे. पी. दत्तांच्या 'पलटण'मध्ये जागा मिळवली. चित्रपट बॅाक्स आॅफिसवर फ्लॅाप झाला, पण हर्षवर्धननं पुन्हा लक्ष वेधून घेतलं. आता 'तैश'च्या माध्यमातून त्याच्याकडं आणखी एक नामी संधी चालून आली आहे.

चित्रपटाची निर्मिती

बिजॅाय यांनी दिग्दर्शनासोबतच या चित्रपटाच्या निर्मितीचीही जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांच्या जोडीला शिवांशू पांडेय आणि दीपक मुकूट हे निर्माते या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या चित्रपटात हर्षवर्धनची जोडी नेहा शर्मासोबत असेल असं बिजॅाय यांच्याकडून समजलं होतं. याशिवाय पूर्वी 'तैश'च्या कलाकारांच्या यादीत अमित साधचाही समावेश होता, पण आता अमितऐवजी पुलकितचं नाव असून, नेहाच्या जागी क्रिती आणि संजीदा या अभिनेत्रींची नावं घोषित करण्यात आली आहेत. त्यामुळं नवीन बदलानुसार या चित्रपटात हर्षवर्धनची जोडी कोणत्या अभिनेत्रीसोबत जमते ते पहायचं आहे.हेही वाचा -

राज ठाकरे ममता दीदींच्या भेटीला, ईव्हीएमविरोधाला मिळणार बळ

लोकलच्या दिव्यांगांच्या डब्यातून गरोदर महिलांना करता येणार प्रवाससंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा