Advertisement

राज ठाकरे ममता दीदींच्या भेटीला, ईव्हीएमविरोधाला मिळणार बळ


राज ठाकरे ममता दीदींच्या भेटीला, ईव्हीएमविरोधाला मिळणार बळ
SHARES
ईव्हीएम विरोधात रणशिंग फुंकण्यास सज्ज झालेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेण्यासाठी मंगळवारी सकाळी कोलकत्याला रवाना झाले आहेत.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी मनसेतर्फे एकही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभा केला नसला, तरी या निवडणुकीत प्रचारसभांचा धडाका लावत भाजपा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर कडाडून टिका केली होती.

ईव्हीएमचा विरोध

त्याचपाठोपाठ त्यांनी काही दिवसांपूर्वी ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत येत्या विधानसभा निवडणुकीत बॅलेट पेपरचा वापर करण्याची विनंती निवडणूक आयोगाला केली होती. सोबतच दिल्लीत त्यांनी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांचीही भेट घेतली होती. ही भेट राजकीय वर्तुळात चांगलाच चर्चेचा विषय ठरली होती.

भाजपाविरोधी गट

याचप्रमाणे ममता बॅनर्जी देखील भाजपा, मोदी आणि शहा यांच्या कट्टर विरोधक समजल्या जातात. दंगलखोरांवरील कारवाईवरून केंद्र सरकार त्यांच्यातील उफाळलेला संघर्ष तर साऱ्या देशाने पाहिला आहे. अशा स्थितीत भाजपाविरोधी सर्व गटांना एकत्र आणण्याचा प्रयत्न राज ठाकरे करताना दिसत आहेत.

९ आॅगस्टला मोर्चा

राज यांच्या नेतृत्वाखाली येत्या ९ आॅगस्टला ईव्हीएमविरोधात माेर्चा काढणार आहेत. या मोर्चाला तृणमूल काँग्रेसही समर्थन मिळावं, अशी राज यांची इच्छा आहे. त्यादृष्टीने विविध पक्षातील नेत्यांच्या घेत असलेल्या भेटींना महत्त्व प्राप्त होत आहे.    



हेही वाचा-

इव्हीएमच्या विरोधात राज ठाकरे ९ ऑगस्टला करणार आंदोलन

‘त्यांचं’ ठरलं ! राष्ट्रवादीचे ५२ नगरसेवक जाणार भाजपात



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा