इव्हीएमच्या विरोधात राज ठाकरे ९ ऑगस्टला करणार आंदोलन

इव्हीएम मशीन विरोधात मनसे ९ ऑगस्टला आंदोलन करणार आहेत. ईव्हीएमविरोधात मैदानात उतरणार आहेत.

SHARE

लोकसभा निवडणुकीत मतदानासाठी वापरण्यत आलेल्या इव्हीएम मशीनबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. तसंच, निवडणुकीत मतदानासाठी इव्हीएमऐवजी बॅलेट पेपरचा वापर करण्यासाठी राज ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत जाऊन मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली होती. मात्र, आता या इव्हीएम मशीन विरोधात मनसे ९ ऑगस्टला आंदोलन करणार आहेत. ईव्हीएमविरोधात मैदानात उतरणार आहेत.

इव्हीएमबाबात भेट

या आंदोलनासाठी राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तसंच, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची देखील भेट राज ठाकरे घेणार असल्याचं समजतं. त्याशिवाय, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचीही राज ठाकरे इव्हीएमबाबात भेट घेणार आहेत.

आंदोलनाची तयारी

ईव्हीएम घालवा आणि बॅलेट पेपर परत आणा ही राज ठाकरे यांची भूमिका आहे. ९ ऑगस्टला ते ईव्हीएमविरोधात मैदानात उतरणार आहेत. ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपर आणा अशी मागणी राज ठाकरे करत आहेत. तसंच, ९ ऑगस्टला होणाऱ्या आंदोलनाची तयारी राज ठाकरे यांनी सुरु केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

निवडणुकीवर बहिष्कार

'काही दिवसातच महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जाहीर होणार आहे. ही निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्यात येणार नसेल तर निवडणुकीवर बहिष्कार टाकू’ अशी मनसेची भूमिका असल्याचं त्यांनी म्हटलं. त्यामुळं यंदाची निवडणुकीत मतदानासाठी निवडणूक आयोग इव्हीएमचा वापर करणार की, बॅलेट पेपरचा वापर करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान, राज ठाकरे विधानसभा निवडणूक लढवणार की नाही? हा प्रश्न अद्याप कायम आहे.हेही वाचा -

मला नाही पक्षबदलूंची चिंता, शरद पवार असं का म्हणाले?

असं पहिल्यांदाच घडणार, विंडिज दौऱ्याआधी विराट एकटाच घेणार पत्रकार परिषदसंबंधित विषय
ताज्या बातम्या