Advertisement

असं पहिल्यांदाच घडणार, विंडिज दौऱ्याआधी विराट एकटाच घेणार पत्रकार परिषद

वेस्ट इंडिज दौऱ्याला रवाना होण्याआधी विराट मुंबईत पत्रकारांना संबोधित करेल, असा खुलासा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) केला आहे.

असं पहिल्यांदाच घडणार, विंडिज दौऱ्याआधी विराट एकटाच घेणार पत्रकार परिषद
SHARES

टीम इंडियाचा (Team India)  कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि आघाडीचा फलंदाज रोहीत शर्मा (Rohit Sharma) यांच्यात मतभेत असल्याने वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाण्याआधी विराट पत्रकारांना संबोधणार नाही, असं म्हटलं जात होतं. परंतु दौऱ्याला रवाना होण्याआधी विराट मुंबईत पत्रकारांना संबोधित करेल, असा खुलासा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) केला आहे.

प्रथा खंडीत होणार

विशेष म्हणजे भारताबाहेरच्या कुठल्याही दौऱ्यावर जाण्याआधी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि प्रशिक्षक एकत्र मिळून पत्रकार परिषद घेण्याची प्रथा आहे. परंतु भारतीय संघाचे प्रशिक्षक (Coach) रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्या प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपल्याने विराट एकटाच पत्रकार परिषद घेईल. त्यामुळे यंदा ही परंपरा खंडीत होणार आहे.

सोमवार संध्याकाळी मुंबईतील पंचतारांकीत हाॅटेलमध्ये ही पत्रकार परिषद होणार आहे. सद्यस्थितीत नवीन प्रशिक्षकाची निवड होईपर्यंत रवी शास्त्री आणि सपोर्ट स्टाफचा कार्यकाळ वाढवण्यात आला आहे.


बीसीसीआयची माहिती

पत्रकार परिषदेत वेस्ट इंडिज दौऱ्याच्या तयारीसोबतच रोहीत आणि विराट यांच्यातील मतभेदांवर प्रश्न विचारले जाऊ शकतात, ही शक्यता लक्षात घेऊन विराट पत्रकार परिषदेला सामोरा जाणार नाही, असं वृत्त प्रसार माध्यमांमध्ये येत होतं. त्यानंतर सर्व चर्चांना पूर्णविराम देत विराट पत्रकार परिषदेला उपस्थित राहील, अशी माहिती बीसीसीआयने ई-मेलद्वारे दिली.

त्यामुळे विराट आणि रोहीतमध्ये खरंच वाद आहे का? कोणत्या कारणांमुळं दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली? या प्रश्नांची उत्तरं खुद्द विराट कोहलीच देऊ शकेल. हेही वाचा-

इतक्यात निवृत्ती नाहीच- धोनी

मुंबईकर अजिंक्य रहाणे ‘वन डे’ संघात का नाही? गांगुलीने केला निवड समितीला सवालसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा