Advertisement

इतक्यात निवृत्ती नाहीच- धोनी


इतक्यात निवृत्ती नाहीच- धोनी
SHARES

वर्ल्डकपमधील टीम इंडियाचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर भारताचा माजी कर्णधार आणि विकेटकिपर बॅट्समन महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण या चर्चांना पूर्णविराम देत आपण इतक्यात निवृत्ती घेणार नसल्याचं धोनीने निवड समितीचे अध्यक्ष एम. एस. के. प्रसाद यांना सांगितल्याची चर्चा क्रिकेशविश्वात रंगली आहे. 

पहिली पसंती नाहीच

वर्ल्डकपमधील संथ फलंदाजीमुळे टीकेचा धनी ठरलेला धोनी आपल्या निवृत्तीची घोषणा करेल असा अंदाज वर्तवण्यात येत होता. पण धोनीने अद्याप तसं केलेलं नाही. धोनीला सन्मानाने निवृत्ती घेण्याचा सल्ला टीम इंडियाच्या निवड समितीने दिल्याचं सांगण्यात येत आहे. या दरम्यान भारतीय वन डे संघात धोनी यष्टीरक्षक म्हणून पहिली पसंती नसेल, असंही सूत्रांकडून सांगण्यात आलं. 

२ महिने रेजिमेंटसोबत

त्या पार्श्वभूमीवर वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी संघ निवड करण्याआधीच धोनीने स्वत: आपण वेस्ट इंडिजला जाणार नसून पुढील २ महिने टेरिटोरियल आर्मीच्या पॅराशूट रेजिमेंटसोबत घालवणार असल्याचं निवड समितीला कळवल्याचं म्हटलं जात आहे. धोनी हा टेरिटोरियल आर्मीच्या पॅराशूट रेजिमेंटमध्ये लेफ्टनंट कर्नल पदावर आहे. सोबतच टीम इंडियाच्या भविष्यातील योजनांमध्ये माझा सहभाग नसेल. परंतु, सध्या तरी मी निवृत्ती घेणार नाही. निवड समितीनं पुढील योजनेनुसार वाटचाल करावी, असं धोनीनं प्रसाद यांना संघ निवडीच्या घोषणेआधी सांगितल्याचं समजत आहे.    

पंतची निवड

त्यामुळे अपेक्षेनुसार निवड समितीने रविवारी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी वनडे, टी-२० आणि कसोटीसाठी युवा फलंदाज आणि विकेटकीपर रिषभ पंतची निवड केली आहे. निवड समितीची पुढील योजना तयार आहे. त्यानुसार समितीला पंतमधील क्षमता आजमावून बघायची आहे. तो तिन्ही प्रकारांसाठी 'फिट' असल्याचंही प्रसाद यांनी सांगितलं. हेही वाचा-

‘असं’ आहे टी २० वर्ल्डकपचं वेळापत्रक, ‘या’ दिवशी होणार भारताचा पहिला सामना

राेहीतकडे वन डे चं कर्णधारपद?Read this story in English
संबंधित विषय
Advertisement