Advertisement

‘असं’ आहे टी २० वर्ल्डकपचं वेळापत्रक, ‘या’ दिवशी होणार भारताचा पहिला सामना

आयसीसीने नुकतंच या वर्ल्डकपचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. आॅस्ट्रेलियात टी २० वर्ल्डकप (T20 World Cup 2020) स्पर्धा पहिल्यांदाच होत आहे.

‘असं’ आहे टी २० वर्ल्डकपचं वेळापत्रक, ‘या’ दिवशी होणार भारताचा पहिला सामना
SHARES

यजमान इंग्लंडने आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप (ICC Cricket World Cup)चं विजेतेपद पटकावल्यानंतर सर्वांना वेध लागलेत ते २०२० मध्ये आॅस्ट्रेलियात होणाऱ्या टी २० वर्ल्डकपचे. आयसीसीने नुकतंच या वर्ल्डकपचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. आॅस्ट्रेलियात टी २० वर्ल्डकप (T20 World Cup 2020) स्पर्धा पहिल्यांदाच होत आहे.

५ आठवडे चालणार

ही वर्ल्डकप स्पर्धा १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर २०२० अशी ५ आठवडे चालणार आहे. एकूण १२ संघांत ही स्पर्धा रंगणार आहे. त्यातही उल्लेखनीय बाब म्हणजे  श्रीलंका आणि बांगलादेश या संघांना कमी रॅंकिंगमुळं सुपर-१२ संघात स्थान मिळवता आलेलं नाही. त्यामुळं त्यांना १२ संघात स्थान मिळवण्यासाठी ग्रुप स्टेजमध्ये भाग घ्यावा लागणार आहे.

आयसीसीने टी २० वर्ल्डकपमधील सुपर-१२ संघांची घोषणा नुकतीच केली आहे. या १२ संघांमध्ये पाकिस्तान, भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तान यांचा समावेश आहे. हे संघ दोन ग्रुपमध्ये विभागले जाणार आहेत.   

'असे' असतील २ ग्रुप

  • ग्रुप अ- पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, ग्रुप ‘अ’ विजेता, ग्रुप ‘ब’ उप-विजेता
  • ग्रुप ब- भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, ग्रुप  ‘अ’ उप-विजेता, ग्रुप ‘ब विजेता 

भारताचे सामने ‘या’ दिवशी

  • २४ ऑक्टोबर - भारत vs दक्षिण आफ्रिका (पर्थ स्टेडियम)
  • २९ ऑक्टोबर - भारत vs क्वालिफायर ए-२ (मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड)
  • १ नोव्हेंबर - भारत vs इंग्लंड (मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड)
  • ५ नोव्हेंबर - भारत vs क्वालिफायर बी-१ (एडिलेड ओव्हल)
  • ८ नोव्हेंबर - भारत vs अफगाणिस्तान (सिडनी क्रिकेट ग्राऊंड)

सेमीफायनल

  • ११ नोव्हेंबर – पहिली सेमीफायनल (सिडनी क्रिकेट ग्राऊंड)
  • १२ नोव्हेंबर १२ – दुसरी सेमीफाइनल (एडिलेड ओव्हल)

फायनल

  • १५ नोव्हेंबर – फायनल (मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड)



हेही वाचा-

राेहीतकडे वन डे चं कर्णधारपद?

संघ निवडीची समिक्षा व्हायलाच हवी!



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा